
Gokhale Institute
Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘DDRCs’ आणि ‘CRCs’ संशोधन प्रकल्पांतर्गत रिसर्च असोसिएट आणि फिल्ड इन्व्हेस्टिगेटर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२६ आहे.
दिव्यांग पुनर्वसन केंद्रांशी संबंधित एका महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पासाठी गोखले इन्स्टिट्यूटतर्फे विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ‘रिसर्च असोसिएट’ आणि ‘फिल्ड इन्व्हेस्टिगेटर’ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना १० सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत ‘रिसर्च असोसिएट’ च्या २ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, या पदासाठी दरमहा ४०,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच, ‘फिल्ड इन्व्हेस्टिगेटर’ या पदाच्या एकूण २० जागा भरण्यात येणार आहेत. या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत असून, इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘रिसर्च असोसिएट’ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अर्थशास्त्र, सांख्यिकी, पब्लिक पॉलिसी, डेव्हलपमेंट स्टडीज, मानसोपचार किंवा समाजकार्य (MSW/Disability Studies) यांसारख्या संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या चार महिन्यांच्या तात्पुरत्या प्रकल्पासाठी अर्ज करताना उमेदवारांना २३६ रुपये ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, ‘फिल्ड इन्व्हेस्टिगेटर’ हे पद दोन महिन्यांच्या कालावधीसाठी असून, या पदासाठी कोणत्याही वयोमर्यादेचे बंधन नाही.
Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
या पदासाठी समाजविज्ञान, समाजकार्य, मानसशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, समाजशास्त्र किंवा विशेष शिक्षण या क्षेत्रातील पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी फ्रेशर्स देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रकल्पाच्या स्वरूपानुसार उमेदवारांना निवडक राज्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संशोधन, सर्वेक्षण आणि डेटा संकलनाचे कार्य करावे लागणार आहे.