फोटो सौजन्य - Social Media
कोल इंडिया MT रिक्रुटमेंट २०२४ ला लवकरच सुरुवात होणार आहे. या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एकूण ६४० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. खाणकाम, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टीम आणि E&T विभागामध्ये MT पदी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरपासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला भारतभर नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशभरात ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : AIIMS मध्ये भरतीला सुरुवात; नागपूर संस्थानात ६२ पदांसाठी व्हॅकन्सी, गोरखपूरमध्ये १४४ पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती
अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. या अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात सखोल आणि अधिक माहिती पुरवण्यात आली आहे. अधिसूचना coal india.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी या अधिसूचनेचा अभ्यास करण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोळ इंडियाच्या coal india.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या भरतीसाठी उमेदवारांना २८ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यास उमेदवारांनी एक महत्वाची बाब लक्षात ठेवावी कि, उमेदवारांना दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज करता येणार आहे. मुदत संपल्यानंतर कोणाचेही आणि कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी कालमर्यादेच्या आत अर्ज करण्यात यावे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना १,१८० रुपयांची भरपाई अर्ज शुल्क म्हणून करायची आहे. तसेच OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी १,१८० रुपयांची भरपाई करायची आहे. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यास पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. काही ठराविक वयोगटातील उमेदवाराच या भरतीसाठी अर्ज करणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर या भरतीसाठी जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास
कोल इंडियाच्या या भर्तीच्या निवड प्रक्रियेमध्ये गेट २०२४ स्कोरच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. पुढे उमेदवारांच्या दस्तऐवजांची पडताळणी केली जाईल. तसेच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या तिन्ही टप्प्यांना पात्र उमेदवारांना नियुक्तीस पात्र ठरेल.