Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण अधिकारी कसे व्हायचे? एकदा वाचाल तर आयुष्य घडवाल, पूर्ण प्रक्रिया

शिक्षण अधिकारी हे पद शैक्षणिक प्रशासनात महत्त्वाचे व प्रतिष्ठेचे मानले जाते. पदवी व B.Ed. ही किमान पात्रता असून उच्च शिक्षण व अध्यापन अनुभव फायदेशीर ठरतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 02:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिक्षण क्षेत्रात प्रशासनात्मक जबाबदारी सांभाळत समाजाच्या शैक्षणिक प्रगतीत थेट योगदान देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी शिक्षण अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. शिक्षण अधिकारी होण्यासाठी सर्वप्रथम योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. साधारणपणे कोणतीही पदवी (B.A./B.Sc./B.Com) आणि त्यासोबत B.Ed. असणे आवश्यक मानले जाते. अनेक वेळा M.A., M.Sc., M.Ed. किंवा शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असल्यास निवडीच्या संधी अधिक वाढतात. काही भरती प्रक्रियेत माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ठरावीक कालावधीचा अनुभवही अपेक्षित असतो. वयोमर्यादा साधारणपणे १८ ते ३८ वर्षे इतकी असते, मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत दिली जाते.

CSB Recruitment 2026 Vacancy : सायंटिस्ट-बी पदांसाठी भरती जाहीर! CSB कडून खास भरती, त्वरित करा अर्ज

शिक्षण अधिकारी पदासाठी भरती प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा राज्य शिक्षण विभागामार्फत केली जाते. यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत सामान्य ज्ञान, भारतीय राज्यघटना, प्रशासन, शिक्षणशास्त्र, शैक्षणिक धोरणे, महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास तसेच चालू घडामोडी यांचा समावेश असतो.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीत उमेदवाराची व्यक्तिमत्त्व, प्रशासकीय क्षमता, शैक्षणिक ज्ञान आणि निर्णयक्षमता तपासली जाते. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते व निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिला जातो. शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्तीनंतर प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांचे प्रशासन, तपासणी, शिक्षक भरती प्रक्रिया, शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सांभाळावी लागते.

Chh. Sambhaji Nagar : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन!

या पदाला शासनाच्या नियमानुसार आकर्षक वेतनश्रेणी, भत्ते, नोकरीची स्थिरता आणि निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा मिळतात. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि संयम ठेवला तर शिक्षण अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते आणि या एका निर्णयामुळे आयुष्याला भक्कम दिशा मिळू शकते.

Web Title: How to be education officer in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
1

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई! मराठीचा समावेश न केल्यास मान्यता रद्द- मंत्री भूसे
2

मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई! मराठीचा समावेश न केल्यास मान्यता रद्द- मंत्री भूसे

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय
3

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.