फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) यांनी सायंटिस्ट-B (पोस्ट-कोकून सेक्टर) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 28 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 18 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी निर्धारित मुदतीत csb.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.
या भरतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत. SC पदासाठी ०६ पदे, ST पदासाठी ०३ पदे, OBC ०५ पदे, EWS साठी ०३ पदे, PwBD-HH साठी ०१ पदे उपल्बध आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून टेक्सटाइल टेक्नॉलॉजी / टेक्सटाइल इंजिनिअरिंग व फायबर सायन्स या शाखांमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयातील वैध GATE 2025 स्कोअर असणे बंधनकारक आहे. GATE स्कोअर नसलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयाची गणना 18 फेब्रुवारी 2026 या तारखेच्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/EWS/PwBD) उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 7व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) पे लेव्हल-10 मध्ये केली जाईल. त्यानुसार उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 प्रतिमाह वेतन मिळेल. हे वेतन पॅकेज प्रतिष्ठित व आकर्षक मानले जाते.
अर्ज शुल्क






