फोटो सौजन्य - Social Media
योगा भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. भारतभरात विविध योग इन्स्टिटयूट आहेत. असे अनेक तरुण आहेत ज्यांना या योगा क्षेत्रात पुढे जायचे आहे आणि उत्तम भविष्य घडवायचे आहे. जर तुम्हाला योग गुरु किंवा योगा शिक्षक बनायचे आहे? किंवा योगा संस्था खुले करायचे आहेत तर हा लेजख नक्की वाचा. झारखंड मध्ये स्थित असलेल्या हजारीबाग येथील विनोबा भावे विश्वविद्यालयमध्ये योगसाधना शिकवण्यात येत आहे. यामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी डिप्लोमा किंवा PG डिप्लोमा करू शकतात. चला तर मग या संबंधित थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
तसेच या ठिकाणी योगा संबंधित MA कोर्सेस उपल्बध आहेत. यासाठी अर्ज कर्त्या उमेदवावरांनी १५ जून ही तारीख लक्षत घेऊन अर्ज करण्यास सुरुवात करावे. येथील योगा विभागाचे अध्यक्ष डॉ. अमित कुमार सिंह
यांचे असे म्हणणे आहे की विनोबा भावे विश्वविद्यालयमध्ये सध्या एक वर्षीय डिप्लोमा कोर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस उपल्बध आहेत. या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक खर्च १६,००० रुपये इतकी आहे. PG डिप्लोमासाठी इच्छुक उमेदवारांना दोन वर्षांसाठी ६०,००० रुपये इतका खर्च येईल.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये इतकी शुल्क भरावे लागणार आहे. करिअरच्या संधीबाबत सांगताना डॉ. सिंह म्हणतात की, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी योग शिक्षक, योग चिकित्सक किंवा ट्रेनर म्हणून रोजगाराच्या संधी मिळवू शकतात. याशिवाय, समाजालाही आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेण्यात त्यांचा हातभार लागतो. आयुष मंत्रालयामार्फत दरवर्षी योग संबंधित अनेक सरकारी नोकऱ्या निघतात.
तसेच, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही योग शिक्षकांच्या नियुक्त्या होत असतात. जर कुणाला करिअरसाठी हा अभ्यासक्रम करायचा नसेल तरी वैयक्तिक जीवनात मानसिक शांती आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी तो नक्कीच उपयोगी पडतो. म्हणजेच, प्रोफेशनल नसेल तरीही पर्सनल वापरासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर आहे.