
education
कार्यालयात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण विश्वासार्हता होय. तुम्ही दिलेली कामे वेळच्या वेळी आणि अचूकपणे पूर्ण करता का, यावर तुमचे ऑफिसमधील वजन ठरते. याशिवाय, तुमच्या वरिष्ठांचे काम सोपे करणे हा दुसरा महत्त्वाचा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसवरील कामाचा ताण कमी करता आणि त्यांना न सांगता नवनवीन जबाबदाऱ्या अंगावर घेता, तेव्हा कंपनीच्या दृष्टीने तुमचे महत्त्व कैक पटीने वाढते. केवळ स्वतःचे काम पूर्ण न करता कंपनीच्या मोठ्या ध्येयांमध्ये योगदान देणे हे एका आदर्श कर्मचाऱ्याचे लक्षण आहे.
तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्याही एका विशेष क्षेत्रात किंवा कौशल्यात पारंगत होऊन ‘तज्ज्ञ’ बनणे. जेव्हा ऑफिसमध्ये एखादी कठीण समस्या येते आणि ती सोडवण्यासाठी सर्वजण तुमच्याकडे येतात, तेव्हा तुम्ही नकळत कंपनीसाठी अपरिहार्य बनून जाता. यासोबतच, कामाच्या ठिकाणी केवळ समस्या सांगणारे न बनता ‘समस्या निवारक’ बनण्याची सवय ठेवा.
अडचणी आल्यास त्यावर योग्य उपाय सुचवणारे कर्मचारी व्यवस्थापनाला नेहमीच आवडतात. तसेच, सहकाऱ्यांशी उत्तम संवाद साधणे, नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवणे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये अपग्रेडेशन करणे या ५ गोष्टी तुम्हाला करिअरमध्ये नेहमीच शिखरावर पोहोचवण्यास मदत करतील.