Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IGNOU Mega Campus Placement : इग्नूच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! १७-१८ सप्टेंबरला मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह

IGNOU Mega Campus Placement 2026: इग्नूचा हा मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह विशेषतः अशा आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जे शिक्षणासोबतच आपल्या करिअरची सुरुवात करू इच्छितात किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 14, 2026 | 02:19 PM
rojgar melava

rojgar melava

Follow Us
Follow Us:

IGNOU Mega Campus Placement 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. विद्यापीठाचा ‘कॅम्पस प्लेसमेंट सेल’ १७ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करत आहे. हा मेळावा इग्नूच्या बी.आर. आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, मैदान गढी, नवी दिल्ली येथे होणार आहे. उमेदवारांची रिपोर्टिंग वेळ सकाळी १० वाजता सुरू होईल.

या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII) आणि ‘ॲक्सिस बँक सेल्स अकादमी’ (ASA) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. यामध्ये बँकिंग, ई-कॉमर्स, हेल्थकेयर, फिनटेक, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि मानवी संसाधन (HR) यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

‘या’ मोठ्या कंपन्या होणार सहभागी

१७ आणि १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सर्व्हिस सेक्टर जॉब ड्राईव्हमध्ये अनेक नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. यामध्ये Axis Bank, Samsung, iEnergizer, Cogent E Services, Tata Play Fiber, Ather आणि 1Point1 Solutions यांचा समावेश आहे. विविध कंपन्यांमध्ये कस्टमर सपोर्ट, सेल्स, बँकिंग व्हॉईस प्रोसेस, प्री-सेल्स आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे.

ॲक्सिस बँकेत २०० हून अधिक जागा

या प्लेसमेंट ड्राईव्हचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘ॲक्सिस बँक सेल्स अकादमी’ची विशेष भरती मोहीम आहे, जी १७ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. याअंतर्गत ‘ऑफिसर सेल्स’ (OS1) च्या २०० हून अधिक जागा रिक्त आहेत.

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

कोण घेऊ शकते सहभाग?

हा ड्राईव्ह इग्नूचे सध्याचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी आहे. उमेदवारांकडे उत्तम संवादात्मक कौशल्य आणि मूलभूत संगणक ज्ञान (Basic Computer Knowledge) असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांना आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. प्लेसमेंट ड्राईव्हला जाताना उमेदवारांनी आपला अपडेटेड रेझ्युमे/CV, शासकीय ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो आणि शैक्षणिक व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या प्रती सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी

विद्यार्थ्यांसाठी फायदा

इग्नूचा हा मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह विशेषतः अशा आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जे शिक्षणासोबतच आपल्या करिअरची सुरुवात करू इच्छितात किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्या एकाच छताखाली येत असल्याने उमेदवारांना एकाच ठिकाणी अनेक रोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Ignou mega campus placement drive september 2026 axis bank samsung jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • High salary Job
  • Jobs Recruitment
  • Namo Maharojgar Melava

संबंधित बातम्या

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर
1

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?
2

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
3

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा
4

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.