फोटो सौजन्य- सोशल मीडिया
BRICS Education Agenda: आर्टिफिशियल इंटेलिजेंस आता फक्त कॉम्प्युटर सायन्सपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. ब्रिक्स (BRICS) देशांच्या शिक्षण मंत्र्यांनी २०२५ मध्ये शिक्षण क्षेत्रातील AI चा वापर, AI साक्षरता आणि जबाबदार AI च्या वापराबाबत संयुक्त घोषणा केली होती. यामध्ये AI मुळे शिकण्याच्या क्षमतेत होणारी सुधारणा, शिक्षणातील व्यक्तिगत गरजांनुसार बदल आणि शैक्षणिक दरी कमी करण्याची त्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली. त्याचबरोबर डेटा प्रायव्हसी, अल्गोरिदम मधील पूर्वग्रह (Algorithmic Bias) आणि नैतिक वापर यांसारख्या आव्हानांवरही भर देण्यात आला.
ब्रिक्सच्या उच्च शिक्षण सहकार्यात कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटीज आधीपासूनच प्रमुख विषय राहिले आहेत. ‘ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून या क्षेत्रांमध्ये जॉइंट प्रोग्राम्स, संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात डेटा सायन्स, क्लायड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरीटी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारखी कौशल्ये शिक्षण आणि रोजगार या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
ब्रिक्स देशांनी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (TVET) ला आपल्या शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. २०२६ मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘BRICS-TCA’ च्या बैठकीत डिजिटल आणि ग्रीन ट्रांझिशनशी संबंधित वर्कफोर्सवर चर्चा झाली. भारताने ‘BRICS इंटरनॅशनल स्किल गॅप स्टडी’ आणि ‘BRICS स्किल्स कॉम्पिटिशन’ सारखे प्रस्तावही मांडले आहेत.
भविष्यातील कौशल्यांची चर्चा केवळ AI पुरती मर्यादित नाही. ब्रिक्सच्या TVET सहकार्यात आधीपासूनच इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्मार्ट सिटीज, स्मार्ट हेल्थकेअर, ड्रोन टेक्नॉलॉजी, ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस यांसारख्या नव्या पिढीच्या कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत इंजिनिअरिंग आणि व्होकेशनल एज्युकेशनमध्ये या क्षेत्रांशी संबंधित प्रात्यक्षिक कोर्सेस आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड ट्रेनिंगची भूमिका वाढणार आहे.
ब्रिक्स देशांसाठी ‘स्पेस’ हे वेगाने उदयास येणारे सहकार्याचे क्षेत्र ठरत आहे. जून २०२६ मध्ये बंगळुरू येथे ‘BRICS हेड्स ऑफ स्पेस एजन्सीज’ची बैठक पार पडली, ज्यामध्ये सदस्य देशांनी रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन आणि स्पेस सस्टेनेबिलिटी यांसारख्या विषयांवर चर्चा केली. यामुळे स्पेस सायन्स, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, रिमोट सेन्सिंग, अर्थ ऑब्झर्व्हेशन आणि स्पेस डेटा या क्षेत्रांतील संशोधन आणि कौशल्य सहकार्याला गती मिळत आहे.
हवामान बदल आणि शाश्वत विकास हा देखील ब्रिक्सच्या शिक्षण अजेंड्याचा महत्त्वाचा भाग आहे. ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीच्या प्राधान्यक्रमात इकोलॉजी आणि क्लायमेट चेंज, एनर्जी, वॉटर रिसोर्स आणि पोल्युशन ट्रीटमेंट या विषयांचा समावेश आहे. म्हणजेच येत्या काळात रिन्युएबल एनर्जी, क्लायमेट टेक्नॉलॉजी, वॉटर मॅनेजमेंट आणि एन्व्हायर्नमेंटल डेटा यांसारख्या आंतरविद्याशाखीय कौशल्यांची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीचा मुख्य उद्देशच सदस्य देशांच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये जॉइंट रिसर्च, ॲकॅडेमिक मोबिलिटी आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. २०२६ मध्ये हे नेटवर्क अधिक मजबूत करण्यावर काम झाले. जुलै २०२६ मध्ये भारतात झालेल्या बैठकीत पारंपरिक आणि आशियाई/स्थानिक ज्ञान प्रणालीला नवा विषय बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
ब्रिक्सचा हा नवीन शिक्षण अजेंडा स्पष्ट करतो की, येत्या काळात फक्त पारंपरिक पदवी पुरेशी ठरणार नाही. AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, IoT, ड्रोन्स, स्पेस टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल स्किल्स या क्षेत्रांमधील ज्ञान आणि प्रात्यक्षिक कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणार आहेत. विशेष म्हणजे, ब्रिक्स देश ही कौशल्ये उच्च शिक्षणासोबतच तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाशी (TVET) जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.






