Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे भरती बोर्डातर्फे (RRB) स्टेशन मास्टरच्या १,२१५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 29, 2026 | 03:10 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
  • या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे?
RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) देशातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध झोनमधील स्टेशन मास्टर पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यामातून एकूण १,२१५ रिक्त पदांवर भरती केली जाणार असून जे उमेदवार रेल्वेमध्ये नोकरीसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठीची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २० ते ३३ वर्षादरम्यान असणे बंधनकारक आहे, तर सरकारी नियमानुसार एससी, एसटी, ओबीसी आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेमध्ये नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगाच्या लेव्हल-६ नुसार ३५,४०० रुपये मूळ वेतन दिले जाणार आहे. स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वैद्यकीय प्रमाणकिरण ‘ए-२’ (A-2) श्रेणीचे असणे अत्यंत आवश्यक असून, यामध्ये चष्म्याविना दूरची व जवळील दृष्टी तसेच रंग ओळखण्याची क्षमता  तपासली जाते.

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस असेल

या भरतीसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये ठेवण्यात आले आहे, ज्यापैकी सीबीटी (CBT) परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर बँक चार्जेस वजा करून ४०० रुपये परत केले जातील. तसेच महिला, ट्रान्सजेंडर, माजी सैनिक, एससी, एसटी, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) यांमधील उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क आहे, जे परीक्षा दिल्यानंतर पूर्णपणे परत केले जाईल. या परीक्षेची निवड प्रक्रिया प्रामुख्याने सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस टेस्ट (CBT), कॉम्प्युटर बेस्ड ॲपिट्यूड टेस्ट (CBAT), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांवर आधारित असेल. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, जेणेकरून अर्जात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही.

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेल्वे भरती बोर्डाच्या या अधिसूचनेनुसार एकूण किती पदांवर भरती होणार आहे?

    Ans: या भरती मोहिमेतून एकूण १,२१५ स्टेशन मास्टर पदांची भरती केली जाणार आहे.

  • Que: अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

    Ans: इच्छुक उमेदवार २५ नोव्हेंबर २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • Que: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे?

    Ans: उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे.

Web Title: Rrb station master recruitment 2026 apply online marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • centrail railway
  • Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा
1

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Bank मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत पहा एका क्लिकवर..
3

MPSC Bank मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत पहा एका क्लिकवर..

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा
4

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.