Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

IIT Placement Blacklist: ऑल इंडिया प्लेसमेंट कमिटीने (AIPC) नोकरीचे ऑफर परत घेणाऱ्या २२ कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. पुढील दोन कॅम्पस प्लेसमेंटसाठी या कंपन्यांसोबत संबंध संपवण्यात आले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 11:18 AM
iit dharwad

iit dharwad

Follow Us
Follow Us:

IIT Placement Blacklist: देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) नवीन प्लेसमेंट सत्र सुरू होण्यापूर्वी ‘ऑल इंडिया प्लेसमेंट कमिटी’ने (AIPC) एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. ज्या २२ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीचे ऑफर देऊन ते नंतर परत घेतले होते, त्या कंपन्यांसोबत पुढील दोन कॅम्पस प्लेसमेंट सत्रांसाठीचे संबंध संस्थेने संपवले आहेत. AIPC ने या कारवाईला ‘ब्लैकलिस्टिंग’ ऐवजी ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) असे नाव दिले आहे.

आयआयटी गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे प्रभावित झालेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओरॅकल’ (Oracle) सह अनेक मोठ्या टेक कंपन्या आणि स्टार्टअप्स या यादीत समाविष्ट आहेत, ज्यांनी कथितपणे डझनहून अधिक ऑफर्स रद्द केल्या होत्या. आता आयआयटी प्रशासन प्रभावित विद्यार्थ्यांचे सीव्ही इतर रिक्रूटर्सना पाठवून त्यांना पर्यायी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

२२ कंपन्यांवर कारवाई

विद्यार्थ्यांचे जॉब ऑफर्स परत घेतल्यामुळे होत असलेल्या त्रासाची दखल घेत २२ कंपन्यांच्या विरोधात ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला आयआयटी गुवाहाटी येथे पार पडलेल्या AIPC च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१५० हून अधिक ऑफर्स प्रभावित

AIPC ही एक केंद्रीय संस्था आहे, जी आयआयटी कॅम्पस मधील प्लेसमेंट आणि इंटर्नशिपशी संबंधित गाईडलाईन्सवर नजर ठेवते. AIPC नुसार, या प्रकरणांमध्ये २३ आयआयटी मधील १५० पेक्षा जास्त ऑफर्सचा समावेश आहे. काही कंपन्यांनी १० ते १५ पर्यंतचे ऑफर्स परत घेतले आहेत.

ब्लैकलिस्टिंग नाही, तर ‘नॉन-कोऑपरेशन’ शब्दाचा वापर

पैनलने कंपन्यांविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईसाठी ‘ब्लैकलिस्टिंग’ हा शब्द न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटीकडून याला ‘नॉन-कोऑपरेशन’ म्हटले जाईल. AIPC चे समन्वयक आणि आयआयटी गुवाहाटीचे असोसिएट प्रोफेसर जॉन जोस यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणांमध्ये अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले ऑफर्स मागे घेतले आहेत. मात्र, त्यांनी या कंपन्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

Ajit Doval and S Jaishankar: BRICS परिषदेपासून जागतिक मंचांपर्यंत; देशाचे ‘हे’ दोन शिलेदार नेमकं किती शिकलेत?

ओरॅकल (Oracle) आणि अनेक स्टार्टअप्स यादीत समाविष्ट

कॅम्पस सूत्रांनुसार, ‘ओरॅकल’ त्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून ‘नॉन-कोऑपरेशन’ची कारवाई सुरू आहे. कंपनीने आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिलेले सुमारे ४० ऑफर्स पूर्ण केले नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या काळात ओरॅकलने जागतिक स्तरावर कर्मचारी कपातही केली आहे, ज्याचा परिणाम भारतातही पाहायला मिळाला. अहवालानुसार, अनेक स्टार्टअप्स देखील या काळ्या यादीत समाविष्ट आहेत.

नोकरीचे प्रस्ताव रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची मदत

ज्या विद्यार्थ्यांचे नोकरीचे प्रस्ताव रद्द झाले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी आयआयटीचे प्लेसमेंट कार्यालये सक्रिय झाली आहेत. या कार्यालयांनी प्रभावित विद्यार्थ्यांचे सीव्ही सध्याच्या भर्तीकर्त्यांसोबत शेअर केले आहेत आणि उपलब्ध पदांसाठी या उमेदवारांचा विचार करण्याची विनंती कंपन्यांना केली आहे.

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

२० ते ३० टक्के विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी

अंदाजानुसार, रद्द केलेल्या ऑफर्समुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कार्यालये आणि कंपन्यांमधील संपर्कामुळे नोकरी मिळाली आहे. मात्र, सर्व प्रभावित विद्यार्थ्यांना पुन्हा नोकरी मिळण्याची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या सध्या उपलब्ध नाही, कारण काही विद्यार्थी संस्थेला न सांगता कॅम्पसबाहेरून थेट अर्ज करून नोकरी मिळवत आहेत.

Web Title: Iit aipc action against companies revoking job offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Chinese companies
  • IIT
  • Job

संबंधित बातम्या

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
1

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
2

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
3

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.