
Image
एम्स नागपूरच्या ॲनेस्थेसियोलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागाचे सहप्राध्यापक डॉ. ओमशुभम गंगाधर आसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आयसीएमआर (ICMR) अर्थसहाय्यित ‘SMRITI’ प्रकल्पांतर्गत संशोधन वैज्ञानिक-I (Project Research Scientist-I) च्या १ तात्पुरत्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पहिल्या वर्षासाठी हा कार्यकाल ९ महिन्यांचा असून, प्रकल्पाची गरज आणि कार्यक्षमतेच्या आधारावर तो वाढवला जाऊ शकतो.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेस, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, क्लिनिकल रिसर्च किंवा पब्लिक हेल्थ यांसारख्या संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे; अथवा इंजिनिअरिंग/आयटी/कॉम्प्युटर सायन्समध्ये चार वर्षांची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील १ ते २ वर्षांचा क्लिनिकल रिसर्चचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ६७,२०० रुपये (५६,००० + २०% HRA) मानधन दिले जाईल.
RRB recruitment 2026: रेल्वेत बंपर भरती! ‘या’ अधिकृत वेबसाईटवर ४ डिसेंबरपर्यंत करा अर्ज
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत एम्स नागपूरच्या अधिकृत Google अर्ज लिंकद्वारे ([https://forms.gle/psM7TNNeiM8E8Gzy8](https://forms.gle/psM7TNNeiM8E8Gzy8)) ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी ईमेल किंवा पोस्टद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि एका पदासाठी १५ पेक्षा जास्त अर्ज आल्यास मुलाखतीपूर्वी लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते.
या पदासाठी मुलाखत २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता एम्स नागपूर येथील ॲनेस्थेसियोलॉजी विभागाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या आयपीडी ओटी कॉम्प्लेक्स (IPD OT Complex) येथे पार पडणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.
Ans: या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
Ans: निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ६७,२०० रुपये (५६,००० + २०% HRA) मानधन दिले जाईल
Ans: या पदासाठी मुलाखत २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता एम्स नागपूर येथील ॲनेस्थेसियोलॉजी विभागाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या आयपीडी ओटी कॉम्प्लेक्स येथे पार पडेल.