Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाखतीचा मंत्र माहितीये का? ‘हे’ कौशल्य कराआत्मसात, “तुम्ही यशाच्या नव्हे तर यश तुमच्या मागे लागेल”

मुलाखत आता कोणत्याही भरती प्रक्रियेमधील महत्वाचा भाग झाला आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे सगळ्यात कठीण आणि महत्वाचा टप्पा आहे. पण त्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक? जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2025 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत ही सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. मात्र आजच्या काळात अनेक नामांकित कंपन्या मुलाखतीला पारंपरिक पद्धतीने न घेता, एक अनौपचारिक संवाद म्हणून पाहतात. त्यामुळे अनेक उमेदवारही ठरावीक प्रश्नांची उत्तरं रटून मुलाखतीला सामोरे जातात. पण ही पद्धत आता कालबाह्य ठरत चालली आहे. मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर सत्र नव्हे, तर ती एक संधी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची, विचारशक्ती दाखवण्याची आणि नोकरीसाठी योग्य उमेदवार असल्याचं पटवून देण्याची.

३३ वेळा हाती आले अपयश! पण मानली नाही हार “जर्नी ऑफ IPS आदित्य कुमार”

मुलाखतीचा मुख्य उद्देश म्हणजे उमेदवाराचा आढावा घेणे, त्याचं विचारमंथन समजून घेणे आणि त्याच्या क्षमतेचा अंदाज घेणे. त्याचबरोबर नियोक्ता ही संधी वापरून उमेदवाराला कंपनीबाबत सकारात्मक विचार करायला भाग पाडतो. यासाठीच प्रत्येक मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे उद्दिष्ट असतात. तुम्ही जर या गोष्टी आधीच समजून घेतल्या, तर तुमची तयारी योग्य पद्धतीने होईल आणि मुलाखतीचा प्रभावही अधिक वाढेल.

फक्त संभाव्य प्रश्नांची उत्तरं पाठ करून उपयोग होत नाही. त्या मागे विचार असावा लागतो. तुम्ही कंपनीबद्दल किती माहिती घेतली आहे, ती भूमिका तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे, आणि तुम्ही त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाल याबद्दल स्पष्ट विचारपूर्वक संवाद साधणं आवश्यक आहे. मुलाखतीत जबाबदाऱ्या, कामातील अडचणी आणि त्यावरील तुमच्या दृष्टिकोनावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उत्तर देताना प्रामाणिकता आणि आत्मविश्वास दाखवणं खूप महत्त्वाचं ठरतं.

आंगणवाडी भरती 2025: १९,००० हून अधिक पदांसाठी सुवर्णसंधी, १२वी उत्तीर्ण महिलांना मोठा दिलासा

मुलाखतीचे अनेक टप्पे असतात, त्यामुळे एका वेळेस एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा. पहिल्या टप्प्यात तुमच्या कौशल्यांचा आढावा घेतला जातो, तर पुढच्या टप्प्यांत तुम्हाला कंपनीबाबत उत्सुकता आहे का, हे तपासलं जातं. अशावेळी तुम्ही मुलाखतीला एक संधी म्हणून पाहा, केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःबद्दल शिकण्यासाठी. शेवटी, काही अफवा पसरलेल्या असतात की सुरुवातीलाच कठीण प्रश्न विचारले जातात. प्रत्यक्षात, नियोक्त्याचा उद्देश असतो, उमेदवाराचा दृष्टिकोन, विचारांची स्पष्टता आणि निर्णय घेण्याची पद्धत समजून घेण्याचा. म्हणूनच अफवांपासून दूर राहा, आणि आत्मविश्वासाने पुढे जा.

“यश मिळवायचं असेल, तर मुलाखत ही फक्त संधी नव्हे तर यशाचा दरवाजा आहे.”

Web Title: Important aspect that should be used during interview to get instant success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • special interview
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत  ‘फेक’ भरतीची जाहिरात
1

Alert : ‘Ghost Hiring’ चा सापळा! तुम्हीही अडकू शकता…, 10 पैकी 4 कंपन्या काढताहेत ‘फेक’ भरतीची जाहिरात

CTET परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांसाठी फक्त शिक्षकच नाही तर ‘या’ क्षेत्रांत सुवर्णसंधी! मिळणार मोठा पगार…
2

CTET परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांसाठी फक्त शिक्षकच नाही तर ‘या’ क्षेत्रांत सुवर्णसंधी! मिळणार मोठा पगार…

तुमचं भविष्य घडवा AI च्या मदतीने! नवीन ट्रेनिंग प्रोग्राम; मिळणार दर महा स्कॅलरशीप, जाणून घ्या सविस्तर
3

तुमचं भविष्य घडवा AI च्या मदतीने! नवीन ट्रेनिंग प्रोग्राम; मिळणार दर महा स्कॅलरशीप, जाणून घ्या सविस्तर

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर
4

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.