Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील ९६ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण! गुरुजी झालं नापास, नाराजीचे वातावरण

मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार घेण्यात आलेल्या २०२५ च्या टीईटी परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील ९६ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण ठरले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 24, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदींनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून, जिल्ह्यातील तब्बल ९६ टक्के शिक्षक या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. एकूण ७ हजार ७०० शिक्षकांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ३०८ शिक्षक पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा एकूण निकाल फक्त ४ टक्के लागला आहे.\

Women Passengers Safety : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त राबवणार उपक्रम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ही परीक्षा दोन वर्षांच्या आत उत्तीर्ण न केल्यास शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ नाकारण्यात येणार आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये वाशिम जिल्ह्यात २२ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

जिल्ह्यातील ७७०० शिक्षकांनी या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी पेपर एकसाठी ३६३९ शिक्षकांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला केवळ ३०४८ शिक्षक उपस्थित राहिले, तर २३१ शिक्षक गैरहजर होते. दुसऱ्या पेपरसाठी ४६०१ शिक्षकांनी नोंदणी केली होती. यापैकी ४३५५ शिक्षक परीक्षेला उपस्थित राहिले, तर २४६ शिक्षकांनी दांडी मारली. एकूण अनुपस्थितीचे प्रमाणही लक्षणीय असल्याने याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

निकालानुसार ७३९२ शिक्षक अनुत्तीर्ण ठरले आहेत. शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या आणि लहानग्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचे हे अपयश शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपयश येणे हे केवळ शिक्षकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

या निकालानंतर पालकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्या गुरुजींनाच परीक्षेत यश मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. “गुरुजी, तुम्हालाही अभ्यासाची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया आता जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

रेल्वे रुळांवरून पालिकेचा केबल-स्टेड पूल जाणार, ५५% काम पूर्ण; महालक्ष्मी-सात रस्ता…, पाहा नेमका मार्ग

दरम्यान, शिक्षण विभागाने या निकालाची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षण, अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन आणि गुणवत्तावाढीच्या उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात शिक्षणाचा दर्जा आणखी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: In the tet exam 96 percent of teachers from washim district failed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • TET
  • TET Exam

संबंधित बातम्या

TET ने शिक्षकांचा पडणार तुटवडा? शिक्षण विभागाच्या आकडेवारीने गुरुजींच्या मनात भीती
1

TET ने शिक्षकांचा पडणार तुटवडा? शिक्षण विभागाच्या आकडेवारीने गुरुजींच्या मनात भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.