के-टीईटी लागू होण्यापूर्वीच, केरळ साक्षरता आणि शैक्षणिक दर्जामध्ये उच्च स्थानावर होता. २०१२ मध्ये के-टीईटी लागू होण्यापूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना ही पात्रता मिळविण्याची संधी नव्हती.
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाही राज्य शासनाने सध्या सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आक्षेप नोंदविताना केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकारले जाणार असून, लेखी निवेदन टपालाने किंवा ई-मेलद्वारे पाठविल्यास त्याचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल त्यांना सेवेतून कमी केले जाणार आहे. त्यामुळे २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांची मोठी…
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेपासून दुपारी तीनच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानावर झाला.
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भूमिका बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात, ज्या शिक्षकांची सेवा निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त आहे.
सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थीना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात १९ जणांना अटक झाली.
राज्यात सध्या जवळपास १८ हजार १०६ कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या हजारोच्या घरात असून, या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची दाट शक्यता आहे.
महा-TET परीक्षेत ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० उमेदवार उपस्थित राहून ९३.९१% उपस्थितीची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील दोन केंद्रांत आठ उमेदवार गैरप्रकार करताना पकडले; समवेक्षकांवर चौकशीची कारवाई.
महाटीईटी २०२५ परीक्षा रविवारी वाशिममधील २२ केंद्रांवर दोन सत्रांत होणार असून सुरक्षेसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
वडील इकबाल औटी, भाऊ अल्ताफ औटी, असलम औटी, शकील औटी यांच्यासह माहेरच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत 'आमच्या मुलीचा घातपात झाला आहे, आमच्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले' असल्याचा आरोप…