या मार्गावर रविवारी विशेष पॉवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या होणार रद्द! प्रवाशांचे हाल
रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून Scouts & Guides कोटा भरण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. कारण या भरतीच्या माध्यमातून फक्त १३ जणांना नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज RRC च्या www.rrcer.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन रूपात करता येणार आहे.
या भरतीची सुरुवात ९ जुलैपासून होणार आहे. उमेदवारांना ८ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात या भरतीच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General / OBC / EWS (Male) या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 5०० रुपये भरावे लागणार आहे. तसेच ४०० रुपये रक्कम परीक्षेनंतर रिफंड करण्यात येईल. SC / ST / PwBD / ExSM / Women / EBC या प्रवर्गांतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये भरायचे आहे. तसेच परीक्षेनंतर संपूर्ण रक्कम रिफंड करण्यात येईल.
या भरतीसाठी काही निकष शैक्षणिक आहेत तर काही वयोमर्यादे संदर्भात आहेत. दहावी तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच वयोमर्यादे संदर्भात माहिती मिळवण्यासाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. दोन टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षेचा समावेश आहे. तसेच सर्टिफिकेटवरील मार्कच्या आधारे नियुक्ती मिळणार आहे.
या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.