Indian Railway Accidents
भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यासाठी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये असणाऱ्या रिक्त जागांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदासाठी 338 जागा, प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT) पदासाठी 188 जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदासाठी 187 जागा, ज्युनियर अनुवादक (हिंदी) पदासाठी 130 जागा, वैज्ञानिक पर्यवेक्षक (एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण) पदासाठी 3 जागा, मुख्य विधी सहाय्यक पदासाठी 54 जागा, सरकारी वकील पदासाठी 20 जागा, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी 18 जागा, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण पदासाठी 2 जागा, वरिष्ठ प्रचार निरीक्षक पदासाठी 3 जागा, स्टाफ आणि कल्याण निरीक्षक पदासाठी 59 जागा, ग्रंथपाल पदासाठी 10 जागा, संगीत शिक्षिका (महिला) पदासाठी 3 जागा, सहाय्यक अध्यापिका (महिला) (ज्युनियर शाळा) पदासाठी 2 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा पदासाठी 7 जागा, आणि लॅब सहाय्यक ग्रेड III (रसायनज्ञ आणि धातुकर्मी) पदासाठी 12 जागा यांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया विविध विभागांमधील गरजा पूर्ण करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने या भरतीचे आयोजन केले आहे. ७ जानेवारी २०२५ पासून या भरतीला सुरुवात केली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करणे आवश्यक आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. विविध पदांचा समावेश या भरतीच्या प्रक्रियेत केला आहे. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक आणि वयोमर्यादे संदर्भात अटी शर्ती आहेत.
नियुक्तीच्या प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना कॉम्प्युटर आधारित परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे तसेच त्याला उत्तीर्ण करावे लागणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तसेच उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेण्यात येईल. तसेच अंतिम टप्प्यात दस्तऐवजांची पडताळणी करावी लागेल.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज शुल्क भरताना सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये भरावे लागणार आहेत.