फोटो सौजन्य - Social Media
कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे. स्कोअरकार्ड ऑनलाईन डाउनलोड करायचा आहे. यासाठी एप्लिकेशन क्रेडेंशियलची गरज भासणार आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेबसाईटवर लॉग इन करता येणार आहे. काल या निकाल संदर्भात अनेक बातम्या येत होत्या, तसेच निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत होते. CAT २०२४ परीक्षेचा निकाल काल मध्य रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल iimcat.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहावे.
अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद आहे कि CAT २०२४ परीक्षे संदर्भात निकाल आता लाईव्ह करण्यात आले आहे. एकंदरीत, महत्वाची बातमी अशी आहे कि या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेन्टाइल निकाल दिला आहे. या १४ विद्यार्थ्यांचा गौरव देशभरात केला जात आहे.
अशा प्रकारे करता पाहता येणार निकाल
सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
मुख्य पृष्ठावर उपलब्ध ‘IIM CAT Result 2024’ या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन क्रेडेन्शियल टाकून घ्या आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसून येईल.
तुमच्या निकालाचा आढावा घ्या आणि भविष्यासाठी पेज डाउनलोड करून ठेवा.
यंदाच्या वेळीही निकालात अभियंता क्षेत्राचा दबदबा
CAT २०२४ परीक्षेसाठी एकूण ३.२९ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील २.९३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी हजेरी लावली होती. मुळात, यंदाच्या वर्षीही CAT वर इंजिनिअर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांची पकड आहे. देशभरातून एकूण १४ विद्यार्थ्यांनी CAT २०२४ परीक्षा १००% टक्क्यांनी उत्तीर्ण केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यातील १३ विद्यार्थी हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील आहेत आणि उर्वरित १ विद्यार्थी नॉन इंजिनिअरिंग क्षेत्रातील आहे. तसेच १४ पैकी १३ विद्यार्थी पुरुष असून १ विद्यार्थी स्त्री आहे.
अशा प्रकारे चेक करता येईल पर्सेन्टाइल
जर तुम्ही CAT २०२४ परीक्षेसाठी उपस्थित होता आणि तुम्हाला तुमचे पर्सेन्टाइल काढायचे आहे. तर तुम्ही या सुत्राद्वारे तुमचे पर्सेन्टाइल काढू शकतात.
= १०० x कोणत्याही समूहात सर्वात जास्त गुण आणणाऱ्या उमेदवाराच्या गुणांपेक्षा कमी गुण आणणाऱ्या उमेदवारांची संख्या / समूहातील एकूण उमेदवारांची संख्या.
उदाहरणार्थ,
एका उमेदवाराने ७०% गुण मिळवले आहेत आणि त्याहून कमी गुण (७०% टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे) विद्यार्थ्यांची संख्या १५,००० आहे तसेच त्या परीक्षेसाठी एकूण १८,००० विद्यार्थी उपस्थित राहिले होते.
पर्सेन्टाइल = १०० x १५,०००/१८,०००
पर्सेन्टाइल = ८३.३३%