Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन; तरुण पोलिसांच्या ताब्यात!

बीड येथील पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 21, 2024 | 09:20 PM
पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन

पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन

Follow Us
Close
Follow Us:

राज्य पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. या भरतीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अशातच आता पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळले आहे. बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बीडमध्ये 170 जागांसाठी पोलीस भरती होत आहे. यासाठी 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, बुधवारपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरु झाली. ही भरती प्रक्रिया सुरु असतानाच आज (ता.21) हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. भरतीसाठी सकाळी आलेल्या एका उमेदवाराने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा प्रकार घडला. सध्या त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टर्मिन इंजेक्शन असल्याचा संशय

काही उमेदवार भरती प्रक्रिया पार करण्यासाठी अशा द्रव्यांचे सेवन करीत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी काही उत्तेजक द्रव्यांची मदत होत असल्याने उमेदवार त्या वापरताना दिसतात. याबाबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “साधारणपणे व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले ‘टर्मिन’ नावाचे इंजेक्शन घेतले जाते. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडलेले इंजेक्शन तेच असावे, असा अंदाज आहे.”

अहवालानंतरच अधिकृत माहिती मिळणार

दरम्यान, पोलिसांनी हे इंजेक्शन जप्त केले असून, याबाबत एफडीएला बोलाविण्यात आले आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल त्यांच्याद्वारे मुंबई येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे. असेही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले आहे.

Web Title: Injection of stimulant police bharti 2024 candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 09:20 PM

Topics:  

  • Beed News
  • Police Recruitment

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?
1

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील
2

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात
3

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश
4

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.