फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या दक्षिण विभागात अप्रेंटिस पदांसाठी भरतीची मोठी संधी जाहीर झाली आहे. एकूण 475 जागांवर ही भरती करण्यात येणार असून, ही प्रक्रिया Apprentices Act, 1961 अंतर्गत पार पडणार आहे. ही पदे ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत. ही भरती तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये होणार आहे.
भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावी लागणार आहे. या निकषांमध्ये शैक्षणिक निकषांचा समावेश आहे. या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांकडे ITI, डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना काही वयोमर्यादेसंदर्भात अटी पात्र कराव्या लागणार आहेत. वयोमर्यादा ही 18 ते 24 वर्षे दरम्यान असावी, आणि 31 ऑगस्ट 2025 या तारखेचा आधार घेतला जाणार आहे. राखीव प्रवर्गासाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
निवड प्रक्रिया ही Merit List (मूल्यांकन यादी), कागदपत्र पडताळणी, आणि वैद्यकीय तपासणी अशा तीन टप्प्यांवर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल. या सर्व टप्प्यांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होता येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर www.iocl.com जाऊन, “Careers” > “Apprenticeships” या विभागात जावे. तिथे दिलेली अधिकृत जाहिरात वाचून, “Apply Online” या पर्यायावर क्लिक करावा. अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा आणि त्याची प्रिंट किंवा अcknowledgment सेव्ह करून ठेवावी.
अंतिम अर्ज करण्याची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईट तपासावी. ही भरती विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन उमेदवारांसाठी अनुभव घेण्याची आणि भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी मिळवण्याची उत्तम संधी आहे. योग्य तयारी आणि वेळेवर अर्ज केल्यास ही संधी तुमचं करिअर घडवू शकते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही फार महत्वाची आणि सुवर्णसंधी आहे.