Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना कसली कोचिंग, ना जास्त खर्च! जिद्दीने केलेले प्रयत्न आले कामी, आशना झाली IPS अधिकारी

ना कोचिंग, ना खर्च — फक्त जिद्दीच्या जोरावर आशना चौधरी IPS अधिकारी बनल्या! UPSC मध्ये तीन प्रयत्नांनंतर मिळवलेलं यश आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 15, 2025 | 06:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ना कोचिंग, ना जास्त खर्च! फक्त जिद्द आणि मेहनत! या गुणांच्या जोरावर आशना चौधरी यांनी अवघड समजली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत IPS अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. आज त्या मथुरेत सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहेत आणि तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.

भारत सरकारने ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’ अंतर्गत मागवले अर्ज! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार Apply

28 ऑगस्ट 1998 रोजी उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील पिलखुवा येथे जन्मलेल्या आशनाने आपले शिक्षण सेंट जेव्हियर्स स्कूल (पिलखुवा), सेंट मेरीज स्कूल (उदयपूर) आणि दिल्ली पब्लिक स्कूल (गाझियाबाद) मधून पूर्ण केले. बारावीत त्यांनी तब्बल 96.5% गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात ऑनर्स पदवी घेतली आणि साउथ एशियन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

यूपीएससीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. 2020 मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली पण यश मिळाले नाही. दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी सुधारली, तरी केवळ 2.5 गुणांनी निकाल हुकला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी आपली रणनीती बदलली आणि प्रचंड मेहनतीनंतर 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 116 मिळवत यश संपादन केले. IAS ची संधी असतानाही त्यांनी IPS पदाची निवड केली, कारण त्यांना कायदा-सुव्यवस्था राखत थेट लोकसेवा करायची होती.

असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी NET देण्याची गरज नाही! स्पेशल भरती… आजच करा अर्ज 

सोशल मीडियावरही आशना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांच्या 2.81 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, जिथे त्या आपले अनुभव आणि प्रेरणादायी विचार शेअर करतात. खासगी आयुष्यात त्यांनी 2022 मध्ये UPSC मध्ये 12 वा क्रमांक मिळवलेल्या IAS अधिकारी अभिनव सिवाच यांच्याशी विवाह केला. दोघांची ओळख ट्रेनिंग दरम्यान झाली आणि तीच ओळख पुढे आयुष्यभराच्या नात्यात रूपांतरित झाली. 26 जुलै 2025 रोजी आशना चौधरी यांनी मथुरेत ASP म्हणून कार्यभार स्वीकारला आणि स्वतःच्या जिद्दीने सिद्ध केलं. यशासाठी कोचिंग नाही, तर प्रत्येक दिनी  दृढ इच्छाशक्तीच सर्वात मोठं शस्त्र आहे.

Web Title: Ips success story of aashana chaudhari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश
1

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश

Success Story : IPS तृप्ती भट्ट यांची कहाणी! मेहनतीचं उत्तम उदाहरण
2

Success Story : IPS तृप्ती भट्ट यांची कहाणी! मेहनतीचं उत्तम उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.