
फोटो सौजन्य - Social Media
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) तर्फे 122 पदांची भरती जाहीर करण्यात आली असून उपव्यवस्थापक व कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदवीधर आणि संबंधित पात्रता असलेले उमेदवार 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत npcil.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. प्रशासकीय व भाषांतर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. याचबरोबर, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) तर्फे कनिष्ठ अभियंता (JE) तसेच इतर तांत्रिक पदांसाठी तब्बल 2,569 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
18 ते 33 वयोगटातील उमेदवार rrbapply.gov.in वर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थांपैकी एक असलेल्या रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे. बँकिंग क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदाने 2,700 अप्रेंटिस पदांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महिन्याकाठी 15,000 रुपयांचे निश्चित स्टायपेंड मिळणाऱ्या या अप्रेंटिसशिपसाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत bankofbaroda.bank.in वर अर्ज करता येणार आहे. बँकिंगच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी आणि करिअरची सुरुवात करण्यासाठी तरुणांमध्ये या भरतीला मोठी मागणी आहे. दरम्यान, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) तर्फे ज्युनियर असोसिएट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी 309 पदांची भरती जाहीर झाली आहे.
20 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार 01 डिसेंबर 2025 पर्यंत ippbonline.bank.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकिंग, फायनान्स आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उमेदवारांसाठी आयपीपीबीची ही भरती करिअर प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जाते. या सर्व भरत्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत मर्यादित आहे. त्यामुळे विविध संस्थांच्या अधिसूचना नीट वाचून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे उमेदवारांसाठी अत्यावश्यक आहे. इच्छुकांना कुठल्याही भरतीत संधी दवडू नये यासाठी संबंधित संकेतस्थळे वेळेवर तपासण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.