फोटो सौजन्य - Social Media
पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ध्येय मोठं असेल तर प्रवास आपोआप लांब असतो, पण थांबणं कधीच पर्याय नसतो.” UPSC च्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ज्या आत्मविश्वासाने, संयमाने आणि प्रगल्भतेने प्रश्नांना सामोरे गेले, तेच त्यांच्या यशाचे खरे गमक ठरले. वरुणा सांगतात की UPSC प्रयत्नांसाठी कधीही कठोर डेडलाइन ठेवू नये, कारण अनेकदा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि ताण वाढतो. त्याऐवजी सातत्य, सुधारणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
UPSC च्या तयारीदरम्यान त्यांच्यात झालेला व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वासातील वाढ आणि विचारांची परिपक्वता यांनी त्यांना पुढील प्रवास अधिक सोपा करून दिला. विद्यार्थ्यांसाठी वरुणांचा सल्ला स्पष्ट आहे. सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करा; मग योग्य दिशेने कठोर परिश्रम सुरू करा. अपयश आल्यास ते शिकण्याची संधी समजून पुन्हा प्रयत्न करा, आणि प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करा. आयएएस वरुणा अग्रवाल यांची ही प्रेरणादायी कथा दाखवून देते की मेहनत, चिकाटी आणि स्वतःवरचा अढळ विश्वास असेल, तर कोणतेही स्वप्न कितीही दूर असले तरी नक्कीच पूर्ण करता येते.






