
फोटो सौजन्य - Social Media
देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रायबरेली येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संस्थेने एकूण 149 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी aiimsrbl.edu.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून वॉक-इन इंटरव्ह्यू मध्ये सहभागी व्हावे. या भरतीत 37 वेगवेगळ्या विभागांमध्ये पदे भरण्यात येणार असून, त्यात एनाटॉमी, एनेस्थेसिया, बायोकेमिस्ट्री, जनरल सर्जरी, न्यूरोलॉजी, यूरोलॉजी, ईएनटी, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन यांसारख्या विभागांचा समावेश आहे.
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS, BDS, MSc, MD, MS, MDS, DNB, DM, MCH किंवा PhD पदवी असावी आणि त्यांचे नाव सेंट्रल किंवा स्टेट मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदलेले असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे ठरविण्यात आली असून, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सूट दिली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-11 पे स्केलनुसार ₹67,700 प्रतिमहिना वेतन आणि इतर भत्ते देण्यात येतील. मुलाखतींचे आयोजन 3 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. उमेदवारांनी सकाळी 10 वाजता एलटी ग्राउंड, मेडिकल कॉलेज बिल्डिंग, एम्स रायबरेली येथे रिपोर्ट करावे. सकाळी कागदपत्रांची तपासणी होईल आणि त्यानंतर दुपारी मुलाखत घेतली जाईल.
उमेदवारांनी जन्म प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट, शैक्षणिक पदवी प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास), जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया सोपी आहे. उमेदवारांनी वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी, पासपोर्ट साइज फोटो चिकटवावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून निश्चित तारखेला इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी recruitment.aiimsrbl@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा 0535-2704415 या क्रमांकावर फोन करून माहिती मिळवू शकतात.