फोटो सौजन्य - Social Media
अंबरनाथकरांनो! रोजच्या धावपळीला कंटाळला आहात. (Job in Ambernath) सकाळी नाही तर पहाटे पहाटे उठणे मग मुंबईच्या दिशेने त्या गर्दीतून वाट काढणे आणि त्या वाटचालीतून कामावर पोहचणे. संध्याकाळी पुन्हा तीच कसरत! तर आता टेन्शन नका घेऊ. तुमची नोकरी आता तुमच्या दारात आली आहे. स्वतः नोकरी तुमच्या दाराशी तुमच्यापाशी चालून आली आहे. ही सुवर्ण संधी नाही तर हिरा आहे. आणि याच लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे.
ही एक सरकारी भरती असून मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ या संस्थेमार्फत या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुळात, भरतीला सुरुवात झाली असून अर्ज ऑफलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण १३३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. संधी कमी आहे आणि स्पर्धा जास्त! त्यामुळे वेळ न दवडता लवकरच कामाला लागा
या भरतीमध्ये ज्युनियर टेक्निशियन, डिप्लोमा टेक्निशियन तसेच ज्युनियर मॅनेजर या तीन पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिक फिटर, मिलराइट, एक्सामिनर, एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग, टूल डिझाईन इ. या विभागांमध्ये ही भरती आयोजली गेली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निकष निश्चित केले गेले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा तसेच एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग पदवी असणाऱ्या उमेदवारांवर विशेष नजर असेल.
वयोमर्यादा पाहिली तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. ज्युनियर टेक्निशियन पदासाठी वेतनश्रेणी ₹२१,००० ते ₹३४,२२७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी वेतनश्रेणी ₹२३,००० ते ₹३७,२०१ रुपये निश्चित करण्यात आली आहे तर ज्युनियर मॅनेजरसाठी वेतनश्रेणी ₹३०,००० – ₹४७,६१० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी अधिसूचनेवर जावे. भरलेला अर्ज “Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, Unit of AVNL, Government of India Enterprise, Ambarnath, District Thane, Maharashtra” या पत्त्यावर पाठवण्यात यावे. उमेदवारांना २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज पाठवण्यापूर्वी भरती अधिसूचना नीट वाचावी.






