Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JoSAA Counselling 2026: इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IIT, NIT आणि IIITच्या जागांमध्ये ४,४७० ची बंपर वाढ

JoSAA Counselling 2026: यंदा IIT, NIT आणि IIIT मध्ये प्रवेश मिळवणे सोपे होणार आहे. कारण एकूण जागांमध्ये ४,४७० ची रेकॉर्डब्रेक वाढ होणार आहे. पहिल्यांदाच आयआयएससी बेंगळुरूच्या जागांचाही जोसामध्ये समावेश असेल. पाहा तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये किती जागा वाढल्या...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 04:10 PM
josaa

josaa

Follow Us
Follow Us:

JoSAA Counselling 2026: देशातील प्रमुख राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी’ची (JoSAA Counselling 2026) समुपदेशन (काउन्सिलिंग) प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मध्ये प्रवेश मिळेल. ‘जोसा’ने जाहीर केलेल्या अधिकृत सीट मॅट्रिक्सनुसार, यंदा इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

जागांच्या संख्येत मोठी वाढ

शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांच्या विश्लेषणानुसार, वर्ष २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये राष्ट्रीय संस्थांमधील इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये ४,४७० ची वाढ झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये एकूण ६२,८५३ जागांवर प्रवेश दिला गेला होता, तर वर्ष २०२६ मध्ये ही संख्या वाढून ६७,३२३ झाली आहे. संस्थांची एकूण संख्याही १२८ वरून १३६ झाली असून, यामध्ये ९ नवीन जीएफटीआय (GFTI) आणि देशातील अव्वल क्रमांकाची संस्था आयआयएससी (IISc) बेंगळुरूचा समावेश झाला आहे.

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…

IIT आणि IISc बेंगळुरूमध्ये प्रवेशाची संधी

इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे देशातील २३ आयआयटी (IIT) मधील जागांमध्ये ६६६ ची वाढ झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये आयआयटीमध्ये १८,१६० जागा आता वाढून १८,८२६ झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, पहिल्यांदाच आयआयएससी (IISc) बेंगळुरूच्या १२५ बीटेक (BTech) जागांचाही जोसा काउन्सिलिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयआयएससीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग, मटेरिअल सायन्स, मॅथेमॅटिक्स अँड कम्प्युटिंग आणि मेकॅनिक्स अँड कम्प्युटिंग यांसारख्या कोर्सेसना प्रवेश मिळेल. या दोन्ही संस्थांच्या मिळून एकूण १८,९५१ जागांवर जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) द्वारे प्रवेश दिला जाईल.

Technical Internship: ६ महिन्यांचे सरकारी प्रशिक्षण आणि बक्कळ मानधन! पदवीधर इंजिनिअर्ससाठी ऑनलाईन अर्जाची सोपी पद्धत जाणून घ्या..

कोणत्या संस्थेत किती जागा वाढल्या?

NIT: एनआयटीच्या जागांमध्ये ६३७ ची वाढ झाली असून, आता एकूण जागा २५,१६२ झाल्या आहेत.

IIIT: ट्रिपल आयटीमध्ये सर्वाधिक १,५७८ जागांची वाढ झाली असून, आता एकूण जागा ११,५१८ झाल्या आहेत.

GFTI: ४७ जीएफटीआयमध्ये १,४६४ जागांच्या वाढीसह आता एकूण ११,६९२ जागांवर प्रवेश दिला जाईल.

Web Title: Josaa counselling 2026 iit nit iiit engineering seats increased seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Engineering College
  • IIT

संबंधित बातम्या

IIT Alumnus Viral Post:”आयआयटीतील ४ वर्षांचे शिक्षण तुरुंगासारखे..”; पदवीधराच्या व्हायरल पोस्टवर का होतेय सोशल मीडियावर चर्चा?
1

IIT Alumnus Viral Post:”आयआयटीतील ४ वर्षांचे शिक्षण तुरुंगासारखे..”; पदवीधराच्या व्हायरल पोस्टवर का होतेय सोशल मीडियावर चर्चा?

IIT Transfer Rules: आयआयटीमध्ये मेडिकल कारणास्तव ट्रान्सफर होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2

IIT Transfer Rules: आयआयटीमध्ये मेडिकल कारणास्तव ट्रान्सफर होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

IIT Hyderabad Placement: आयआय़टीमध्ये मिळते तब्बल इतक्या लाखांचे पॅकेज; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि कटऑफचे संपूर्ण गणित
3

IIT Hyderabad Placement: आयआय़टीमध्ये मिळते तब्बल इतक्या लाखांचे पॅकेज; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि कटऑफचे संपूर्ण गणित

IIT Online Courses: जेईई परीक्षेविना आयआयटीमध्ये प्रवेश! घरबसल्या ‘हे’ लोकप्रिय ऑनलाईन कोर्सेस करण्याची सुवर्णसंधी
4

IIT Online Courses: जेईई परीक्षेविना आयआयटीमध्ये प्रवेश! घरबसल्या ‘हे’ लोकप्रिय ऑनलाईन कोर्सेस करण्याची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.