Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : “खेळ आठवणीतले गावाकडचे”; विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाचा खास उपक्रम

डिसेंबर सुरु होताच खेळांना सुरुवात होते. सध्या सोशल मीडियामुळे या खेळांचं स्वरुप देखील काहीसं बदलत गेलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 23, 2025 | 12:47 PM
Kolhapur News : “खेळ आठवणीतले गावाकडचे”; विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाचा खास उपक्रम
Follow Us
Close
Follow Us:
  • खेळ आठवणीतले गावाकडचे
  • विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाचा खास उपक्रम
कोल्हापूर : डिसेंबर सुरु होताच खेळांना सुरुवात होते. सध्या सोशल मीडियामुळे या खेळांचं स्वरुप देखील काहीसं बदलत गेलं आहे. शाळा असो की कॉलेज हल्लीच्या विद्यार्थ्यांना डिजीटल गेममुळे मैदानी खेळांची फारशी ओळख राहिलेली नाही. याचकारणाने कोल्हापूरातील महाविद्यालयात मैदानी खेळांचा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यालय आणि उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताह निमित्त ‘खेळ आठवणीतले गावाकडचे!’ हा पारंपरिक खेळांचा कार्यक्रम उत्तूर विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडला. तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सचिव प्रा. एन. टी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.मोबाईल, सोशल मीडिया आणि टी.व्ही. च्या विळख्यात सापडलेल्या लहान मुलांना आपल्या पारंपरिक खेळांची ओळख व्हावी आणि त्यातून विविध गुण आत्मसात व्हावेत, यासाठी उत्तूर विद्यालयाच्या मैदानावर जवळपास 300 विद्यार्थ्यांनी अनेक पारंपरिक खेळ साजरे केले.

यामध्ये विठू दांडू, भातुकली, आबाधुवी, लगोरी, काचाकवड्या, जिभली, जू फिरवणे, छकडा गाडी, भोवरा, पतंग, आट्‌यापाट्या, दोरी उड्या, झुकझुक गाडी असे अनेक जुने नानाविध खेळ सादर केले. या खेळांच्या विषयी मुलांना माहिती झाली. या खेळांचे महत्त्वही मुलांना कळाले. शारीरिक व्यायामाबरोबर बौद्धिक व्यायाम तसेच सांघिक वृत्ती वाढीस लागणे आणि मोबाईलपासून दूर राहणे यासारखे महत्त्व या पारंपरिक खेळांचा समावेश आहे. यावेळी बी. व्ही. पाटील, संदीप बादरे, तानाजी कांबळे, कविता व्हनबट्टे, उमाराणी जाधव उपस्थित होते.

AI च्या जोरावर उजळणार तुमच्या मुलाचे भविष्य! ‘हे’ ५ कोर्सेस देतील लाखो-करोडोंचे पॅकेज; आजच करा तयारी

मुले पारंपरिक खेळ खेळत होती. त्यांना पाहून तालुका क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनाही खेळण्याचा मोह आवरला नाही. पाटीलही मुलांसोबत खेळात रमल्या. विद्यार्थी देखील त्यांच्या सोबत खेळू लागले. प्राचार्य आर. डी. महापुरे यांनी स्वागत केले. कलाशिक्षक इंद्रजित बंदसोडे यांनी खेळाविषयी माहिती दिली.

TET प्रश्नपत्रिकेवर आक्षेप आहे? मग उमेदवारांनो आवश्यक पुराव्यासह थेट…; वाचा सविस्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘खेळ आठवणीतले गावाकडचे!’ हा उपक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता?

    Ans: हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, उत्तूर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

  • Que: या पारंपरिक खेळांच्या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले होते?

    Ans: कार्यालय आणि उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताह निमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला.

  • Que: या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: : तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Kolhapur news uttoor vidyalaya and junior college conduct special activities to introduce students to outdoor sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra news
  • Sports

संबंधित बातम्या

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील
1

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलला, हा खेळाडू सांभाळणार संघाची धुरा! चौथ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी संघ जाहीर
2

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलला, हा खेळाडू सांभाळणार संघाची धुरा! चौथ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी संघ जाहीर

AUS vs ENG : “माझे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण…” अ‍ॅशेसमधील निराशाजनक पराभवानंतर ब्रेंडन मॅक्युलम राजीनामा देणार का?
3

AUS vs ENG : “माझे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण…” अ‍ॅशेसमधील निराशाजनक पराभवानंतर ब्रेंडन मॅक्युलम राजीनामा देणार का?

IND vs SL Women’s : कधी आणि कुठे पाहता येणार टीम इंडियाचा दुसरा T20 सामना? वाचा Live Streaming ची संपूर्ण डिटेल्स
4

IND vs SL Women’s : कधी आणि कुठे पाहता येणार टीम इंडियाचा दुसरा T20 सामना? वाचा Live Streaming ची संपूर्ण डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.