कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत आहे.
राधानगरी तालुक्यतील राजर्षी शाहू सागर जलाशय काळमवाडी या तलावात 22 टीएमसी पाणीसाठा असून, अतिरिक्त पाणी विजगृहातून दुधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू ठेवला आहे.
संततधार पावसामुळे व राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे गेल्या चार दिवसात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
कुंभी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आज सुरू असणारा १३१० क्युसेक विसर्गामध्ये १३०० क्युसेकने वाढ करून वक्रद्वारातून २६१० व विद्युतगृहातून चालू आहे.
सध्या गगनबावडा परिसरात जोरदार पाऊस असल्याने तसेच पंचगंगा नदीला पूर आल्याने गगनबावडा कोल्हापूर वाहतूक मार्ग पूर्णता बंद झाला आहे .त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणे सुद्धा धोकादायक बनले आहे.
गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर सह पश्चिम करवीर भागात पावसाने दणका दिला असून पुराचा वेढा पडला आहे. गेल्या दोन दिवसात पावसाने परत एकदा जोरदार सुरुवात केली आहे.
संगीता मेथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळंदगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप केला आहे.
सतेज पाटील यांनी गारगोटी, आकुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तिपीठ विरोधात झेंडा झळकवून आदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात एकोंडी (ता. कागल) येथील शिवारामध्ये झेंडा झळकवून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महामंडळाने सादर केलेल्या डीपीआरला मंजुरी देऊन सप्टेंबर २०२४ रोजी ६०९.५८ कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला.
विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेलच त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.
अनेक जिल्ह्यात विस्तार अधिकारी व इतर अधिकारीही सामूहिक रजेवर गेले आहेत. यामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.