टीईटी प्रश्नपत्रिकेवरील आक्षेप नोंदविण्याची मुदत २७ डिसेंबरपर्यंत
विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
२३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २३ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीबाबत काही आक्षेप अथवा त्रुटी आढळल्यास उमेदवारांनी आवश्यक पुराव्यासह ऑनलाइन पद्धतीने त्याच संकेतस्थळावर परिषदेकडे सादर करावेत.
सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन आक्षेपांचा विषयतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार सखोल विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. उमेदवारांनी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आक्षेप नोंदवावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी
२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या
सन २०१३ पूर्वी शिक्षक म्हणून रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्यतेतून सूट द्यावी, अशी ठाम मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षक सभेने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. शिक्षक सभेचे म्हणणे आहे की, २०१३ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची भरती त्यावेळच्या शासन धोरणानुसार करण्यात आली होती. नियुक्तीपूर्वी त्यांनी आवश्यक त्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या असून गुणवत्तेच्या आधारेच त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना आता नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास सक्ती करणे अन्यायकारक आणि अयोग्य आहे, असे मत शिक्षक सभेने व्यक्त केले आहे.













