Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची संधी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) उप-मुख्य विद्युत अभियंता (Deputy Chief Electrical Engineer) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ३ पदे भरली जाणार असून कामाचे ठिकाण CBD बेलापूर, नवी मुंबई आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 12:30 PM
Konkan Railway Recruitment 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Konkan Railway Recruitment 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • KRCL मध्ये उप-मुख्य विद्युत अभियंता पदाच्या एकूण ३ जागांसाठी भरती.
  • कामाचे ठिकाण CBD बेलापूर, नवी मुंबई.
  • IRSEE केडर आणि रेल्वे सेवेत किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • कमाल वयोमर्यादा ५० वर्षे; निवड कागदपत्रे, चाचणी किंवा मुलाखतीद्वारे.
Konkan Railway Corporation Limited: रेल्वेमध्ये चांगल्या पदावर जायचं स्वप्न पाहताय का? तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच KRCL ने आपल्या विभागासाठी नवीन भरती काढली आहे.या वेळी त्यांनी उप-मुख्य विद्युत अभियंता या पदासाठी लोक मागवले आहेत. इंग्रजीत या पदाला Dy. Chief Electrical Engineer असं म्हणतात. ऑक्टोबर 2026 मध्ये याची अधिकृत जाहिरात आली आहे आणि एकूण 3 पदं भरली जाणार आहेत.ही भरती फ्रेशर्ससाठी नाही, तर जे आधीपासून रेल्वे सेवेत आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे पात्रता नीट वाचून मगच अर्ज करा. Konkan Railway Recruitment 2026:
  • माहितीसंस्था – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)
  • पद – Dy. Chief Electrical Engineer
  • जागा – एकूण 3
  • कामाचे ठिकाण – CBD बेलापूर, नवी मुंबई
  • फॉर्म कसा भरायचा – ऑफलाईन पद्धतीने
  • शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2026

पात्रता काय लागेल?

सगळ्यात पहिली अट म्हणजे तुम्ही IRSEE केडरचे अधिकारी असले पाहिजे. आणि तुमची रेल्वेमधील नोकरी कमीत कमी 5 वर्षे झालेली असावी. जर तुम्ही सध्या JAG (Judge Advocate General) किंवा Senior Scale मध्ये काम करत असाल तर तुम्हाला पाहिले प्राधान्य दिले जाईल.

अनुभव किती पाहिजे?

रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल. जसं की डिझाईन बनवणे, प्लॅनिंग करणे, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणे, पॉवर सप्लाय सांभाळणे, OHE चं काम, इलेक्ट्रिक इंजिन आणि EMU ट्रेनचं मेंटेनन्स, ट्रेन चालवणे, क्रू मॅनेजमेंट किंवा इलेक्ट्रिकल जनरल सर्व्हिस यापैंकी कोणत्याही एका कामाचा अनुभव असेल तरी चालेल. हा अनुभव तुम्ही इंडियन रेल्वे, एखाद्या PSU कंपनीत किंवा मेट्रोमध्ये घेतलेला असला तरी ग्राह्य धरला जाईल.

NMC Guidelines: ‘१००% खात्रीशीर उपचारांचे’ दावे आता पडणार महागात; NMC च्या नव्या गाईडलाईन्समुळे भ्रामक जाहिरातींना चाप

याशिवाय तुम्हाला रेल्वे बोर्डाचे आणि RDSO चे सगळे नियम, स्पेसिफिकेशन आणि कोड माहीत असणे गरजेचे आहे.वय किती पाहिजे?या पदासाठी वयाची लिमिट ठेवली आहे. जास्तीत जास्त वय 50 वर्षांपर्यंतच चालेल. 50 च्या पुढे असाल तर फॉर्म भरता येणार नाही.

सिलेक्शन कसं होईल?

यात कसलीही लेखी परीक्षा मोठ्या प्रमाणावर होणार नाही. कंपनी तुमचे डॉक्युमेंट्स बघेल आणि तुम्हाला टेस्ट किंवा थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावेल. इंटरव्ह्यूमध्येच तुमचं फायनल सिलेक्शन होईल.

अर्ज पाठवायचा कसा?

लक्षात घ्या, ही पूर्णपणे ऑफलाईन भरती आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा नाहीये.तुम्हाला तुमचा बायोडाटा, सर्व्हिस सर्टिफिकेट आणि इतर सगळी कागदपत्रे जोडून एका पाकिटात घालून या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायची आहेत.पत्ता – The Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Limited, CBD Belapur, Navi Mumbai – 400614

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

एक महत्त्वाचं, पोस्टाने अर्ज पाठवण्याआधी तुम्ही त्याची एक स्कॅन कॉपी या ईमेलवर पण पाठवा – spo.gnanadeep@krcl.co.in. म्हणजे तुमचा अर्ज वेळेत पोहोचला आहे हे त्यांना कळेल. 6 नोव्हेंबर 2026 च्या आत अर्ज तिथे पोहोचला पाहिजे. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. आत्ताच कोकण रेल्वेची वेबसाईट www.konkanrailway.com वर जाऊन PDF जाहिरात डाऊनलोड करा आणि वाचून घ्या.

Web Title: Konkan railway recruitment 2026 deputy chief electrical engineer 3 posts rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • kokan railway
  • Recruitment Process

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.