Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC-HSC Exam 2027: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2027च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

SSC-HSC Exam 2027 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2026 | 12:02 PM
10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Follow Us:
  • दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
  • महाराष्ट्र बोर्डाकडून वेळापत्रक प्रसिद्ध
  • पाहा परीक्षांच्या तारखा
SSC-HSC Exam 2027 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board Exam 2027) वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam 2027) बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडळाने प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या तारखा अधिकृतपणे प्रसिद्ध केल्या. त्यामुळे बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तारखांचे नियोजन करता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रकटनाद्वारे ही माहिती दिली.

दरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.

NEET PG 2026 Counselling: दुसऱ्या फेरीचे शेड्युल बदलले, आता ७ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू

बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून…

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहेत. त्यानंतर बारावीच्या लेखी परीक्षेला सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षा गुरुवार, १८ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहेत.

दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून…

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या लेखी परीक्षेला सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरुवात होईल. या परीक्षा सोमवार, १५ मार्च २०२७ रोजी संपणार आहेत.

अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

मंडळाने जाहीर केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक ६ नोव्हेंबर २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी आणि पालकांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे महत्त्वाचे आवाहन

दरम्यान, मंडळाने विद्यार्थ्यांना वेळापत्रकाबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे. अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी संबंधित शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहण्यापूर्वी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून मिळालेल्या छापील वेळापत्रकाची खात्री करावी. व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा इतर अ

MPSC Recruitment 2026: MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट! गट-क भरतीत पदसंख्या वाढली; आता १६ हजार ७१७ जागांसाठी भरती

परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा एका नजरेत

परीक्षेचा तपशील  बारावी (HSC)  दहावी (SSC)
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू २० जानेवारी २०२७ २८ जानेवारी २०२७
प्रात्यक्षिक परीक्षा समाप्त  ६ फेब्रुवारी २०२७ १३ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा सुरू ८ फेब्रुवारी २०२७ १५ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा समाप्त १८ मार्च २०२७ १५ मार्च २०२७

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र बोर्डाची बारावीची लेखी परीक्षा २०२७ मध्ये कधी सुरू होणार आहे?

    Ans: बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून गुरुवार, १८ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.

  • Que: दहावीची बोर्ड परीक्षा २०२७ मध्ये कधी होणार आहे?

    Ans: दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.

  • Que: दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक कुठे पाहता येईल?

    Ans: विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांकनिहाय वेळापत्रक पाहता येईल.

Web Title: Maharashtra board exam time table 2027 ssc hsc exam dates announced sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • hsc exam
  • Maharashtra Board Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.