
admission
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एकूण ५०,१५३ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या जागांवर प्रवेश निश्चित केला आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या (२०२५-२६) तुलनेत यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ७,४२१ ने वाढ झाली आहे. मागील वर्षी ४२,७३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात एकूण ५३,३२८ जागा उपलब्ध होत्या, तर एकूण ७०,०३८ उमेदवारांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ७ जुलै ते २२ जुलै २०२६ या कालावधीत पार पडली.
सीईटी सेलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे:
ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत चार फेऱ्या आणि त्यानंतर संस्थात्मक फेरीद्वारे पूर्ण करण्यात आली:
संस्थात्मक फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उपलब्ध ५३,३२८ जागांपैकी ५०,१५३ जागा भरल्या गेल्या. त्यामुळे सीएपी कोटामधील एकूण ३,१७५ अभियांत्रिकी जागा रिक्त राहिल्या आहेत.