
SSC Board Result 2026
Maharashtra SSC Board Result 2026: दहावीचा निकाल लागला! मुलींनी पुन्हा मारली बाजी
यंदाच्या निकालात एकूण 179 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. हेच यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात राज्यभरातील एकूण 179 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. संभाजीनगरमध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोल्हापुरातील एकूण 15 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच पुण्यातील एकूण 12 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. कोकण विभागातील एकूण 7 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर नाशिकमध्ये एकूण 6 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. मुंबई शहरातील एकूण 5 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर नागपूरमधील एकूण 3 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. अमरावतीमधील एकूण 3 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.