Maharashtra SSC Board Result 2026: दहावीचा निकाल लागला! मुलींनी पुन्हा मारली बाजी
अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत प्रशिक्षण! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आणि अन्य वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकणार आहेत. या निकालात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसणार आहेत. काही दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेतून त्यांची गुणपत्रिका दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की, राज्यात दहावीचा निकाल 92.09 टक्के इतका लागला आहे. म्हणजेच 12 वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील 2 टक्क्यांनी घसरला आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वात अव्वल कामगिरी केली आहे. यंदा कोकण विभागाचा 97.62 टक्के लागला आहे. तर छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल 88.41 टक्के लागला आहे. तसेच पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक आहे. येत्या काही वेळातच विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थी https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.






