Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

MBBS from abroad without FMGE : रशिया किंवा कझाकिस्तान या देशातून एमबीबीएस केल्यास भारतात FMGE ची परीक्षा पास करावी लागते. मात्र जगात असे ५ प्रमुख इंग्रजी भाषिक देश आहेत जिथे एमबीबीएस केल्यास भारतात FMGE परीक्षा देण्याची गरज नाही. NMC च्या नियमांनुसार हे ५ देश कोणते आहेत, जाणून घ्या सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 09, 2026 | 01:10 PM
doctor

doctor

Follow Us
Follow Us:

MBBS from abroad without FMGE : दरवर्षी भारतातील हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात जातात. रशिया, कझाकिस्तान किंवा उझबेकिस्तान यांसारख्या देशांमधून शिक्षण घेऊन परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात डॉक्टरीचा परवाना मिळवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची FMGE (Foreign Medical Graduate Examination) ही स्क्रीनिंग परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा पास होण्याचा टक्का खूपच कमी असतो, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डिग्री असूनही नुकसान होते.

खूप कमी लोकांना हे माहीत आहे की जगात ५ असे प्रमुख देश आहेत, जिथे एमबीबीएस केल्यानंतर भारतात परतल्यावर FMGE परीक्षा द्यावी लागत नाही. नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमांनुसार, जर तुम्ही या ५ इंग्रजी भाषीक देशांमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि तिथे प्रॅक्टिसचा परवाना मिळवला, तर भारतात थेट वैद्यकीय नोंदणीचा अधिकार मिळतो. जाणून घेऊया त्या ५ देशांबद्दल आणि त्यांच्यासाठी काय नियम बनवले आहेत.

परदेशातून शिक्षण घेतल्यानंतर भारतात थेट डॉक्टर बनण्याची संधी

१. अमेरिकेत MD आणि USMLE

अमेरिकेत एमबीबीएसला एमडी (Doctor of Medicine) म्हटले जाते. येथील वैद्यकीय शिक्षणाला जगात सर्वात उच्च दर्जाचे मानले जाते. जर तुम्ही अमेरिकेतून एमडी केले आणि त्यांच्या USMLE (United States Medical Licensing Examination) च्या सर्व पायऱ्या पार करून तिथला मेडिकल परवाना मिळवला, तर भारतात परतल्यावर FMGE देण्याची गरज पडत नाही.

२. ब्रिटन (UK) – PLAB परीक्षा आणि GMC नोंदणी

ब्रिटनच्या वैद्यकीय पदव्यांकडे भारतात अत्यंत आदराने पाहिले जाते. युकेच्या रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून उत्तम क्लिनिकल प्रशिक्षण मिळते. जर तुम्ही युकेमधून एमबीबीएस केले असेल आणि तिथली PLAB (Professional and Linguistic Assessments Board) परीक्षा पास करून GMC (General Medical Council) मध्ये नोंदणी केली असेल, तर तुम्ही भारतात FMGE शिवाय डॉक्टरी करू शकता.

३. ऑस्ट्रेलिया – AMC परवाना आणि जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा

ऑस्ट्रेलियन मेडिकल युनिव्हर्सिटीज त्यांच्या संशोधनासाठी आणि उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळखल्या जातात. ऑस्ट्रेलियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना AMC (Australian Medical Council) ची परीक्षा उत्तीर्ण करून तिथला परवाना मिळवावा लागतो. जसा तुमच्याकडे ऑस्ट्रेलियाचा मेडिकल परवाना येतो, तसा भारताचा NMC तुम्हाला इथे प्रॅक्टिस करण्याची थेट परवानगी देतो.

UPSC Update: यूपीएससीबाबत मोठी बातमी! IAS-IPS पदांसाठी निवड होणाऱ्यांची संख्या का घटली? जाणून घ्या सविस्तर..

४. कॅनडा – MCCQE परीक्षेद्वारे थेट परवाना

कॅनडामध्येही वैद्यकीय शिक्षणाचा स्तर अत्यंत कडक आणि मजबूत आहे. येथून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MCCQE (Medical Council of Canada Qualifying Examination) उत्तीर्ण करावी लागते. कॅनडामध्ये परवानाधारक डॉक्टर म्हणून काम करण्याची पात्रता मिळताच तुम्ही भारतात कोणतीही FMGE परीक्षा न देता स्वतःचे क्लिनिक सुरू करू शकता किंवा रुग्णालयात काम करू शकता.

५. न्यूझीलंड – NZREX आणि शांततापूर्ण वातावरण

न्यूझीलंड त्याच्या शांत जीवनशैली आणि जागतिक पातळीवरील आरोग्य सेवांसाठी प्रसिद्ध आहे. येथील वैद्यकीय विद्यापीठांमधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना NZREX (New Zealand Registration Examination) द्वारे तिथला परवाना मिळतो. या परवान्याच्या आधारावर भारतात FMGE मधून पूर्णपणे सूट मिळते.

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..

NMC ची ही अट लक्षात ठेवा

FMGE शिवाय भारतात प्रॅक्टिस करण्याची सवलत केवळ त्या देशाच्या नावावर मिळत नाही. NMC चा स्पष्ट नियम आहे की, या ५ देशांमधून पदवी घेण्यासोबतच तेथील अधिकृत मेडिकल प्रॅक्टिस परवानाही मिळवणे आवश्यक आहे. जर तुम्ही शिक्षण तर तिथून घेतले पण तिथला परवाना घेतला नाही, तर भारतात परतल्यावर तुम्हालाही परीक्षा द्यावी लागू शकते.

Web Title: Mbbs from abroad countries without fmge exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • education
  • MBBS
  • Medical

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
2

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.