Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS Full Form History: ‘MBBS’ या डॉक्टर पदवीचा रंजक इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर..

डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमबीबीएस (MBBS) पदवीचा इतिहास अतिशय रंजक आहे. हा शॉर्ट फॉर्म 'BMBS' न होता 'MBBS' का झाला, यामागील लॅटिन भाषेचे कारण जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 23, 2026 | 03:31 PM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

डॉक्टर हा शब्द आठवताच पहिल्यांदा डोक्यात येते एमबीबीएस (MBBS). या शब्दाचा फुल फॉर्म हा ‘बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी’ असा होतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का हा शब्द नेमका कसा तयार झाला आहे? लॅटिन भाषेतून तयार झालेल्या या शब्दामागे रंजक इतिहास नेमका काय आहे? चला तर मग जाणून घेऊया

लॅटिन भाषेतून झाली ‘MBBS’ शब्दाची उत्पत्ती

लॅटिन भाषेतून आलेला हा शब्द डॉक्टर बनण्यासाठीची प्राथमिक पदवी आहे, जी पूर्ण केल्यानंतर कोणतेही व्यक्ती रुग्णावर उपचार करण्यास पात्र ठरते. इंग्रजीत एमबीबीएसला ‘Bachelor of Medicine, Bachelor of Surgery’ म्हटले जाते. परंतु, त्याची उत्पत्ती लॅटिन भाषेतून झाली आहे.

लॅटिनमध्ये या पदवीला ‘Medicinae Baccalaureus Baccalaureus Chirurgiae’ असे म्हटले जाते. लॅटिन व्याकरणाच्या नियमांनुसार, ‘Medicinae Baccalaureus’ चा अर्थ ‘बॅचलर ऑफ मेडिसिन’ असा होतो आणि ‘Baccalaureus Chirurgiae’ चा अर्थ ‘बॅचलर ऑफ सर्जरी’ असा होतो. लॅटिन भाषेत ‘Medicinae’ हा शब्द आधी येतो. त्यामुळे शॉर्ट फॉर्म तयार करताना ‘M’ हा शब्द आधी ठेवण्यात आला आणि ‘Baccalaureus’ (Bachelor) साठी ‘B’ हा शब्द नंतर घेण्यात आला. याच कारणामुळे हे ‘BMBS’ न बनता ‘MBBS’ असे बनले.

BEML Recruitment 2026: आयटीआय पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी! ‘BEML’ मध्ये बंपर भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

जुन्या काळात, विशेषतः ब्रिटन आणि युरोपमध्ये, औषधोपचार करणारे आणि शस्त्रक्रिया करणारे (Surgeons) हे दोन वेगवेगळे गट मानले जायचे. दोघांचे प्रशिक्षण आणि कॉलेजेसही वेगवेगळे असायचे. परंतु, १९ व्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिशांच्या हे लक्षात आले की, एका चांगल्या डॉक्टरला या दोन्ही क्षेत्रांची उत्तम माहिती असणे आवश्यक आहे. याच विचाराने हे दोन्ही कोर्सेस एकत्र करून एक संयुक्त पदवी तयार करण्यात आली, ज्याला आज आपण ‘एमबीबीएस’ या नावाने ओळखतो.

एमबीबीएसचा कोर्स किती वर्षांचा असतो?

भारतातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे NEET-UG ही परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळतो.

एमबीबीएसचा संपूर्ण कोर्स ५.५ वर्षांचा असतो. त्याचे दोन भागांत वर्गीकरण केले जाते.

४.५ वर्षांचा शैक्षणिक अभ्यास: यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून मानवी शरीर, आजार, औषधे आणि उपचारांच्या पद्धतींबद्दल सविस्तर शिकवले जाते.

Coaching Centers Rules: तुमच्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देण्यापूर्वी केंद्राचे कोचिंगसंबंधित ‘हे’ कडक नियम एकदा वाचाच…

१ वर्षाची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप: अभ्यास पूर्ण झाल्यानंतर १ वर्षासाठी कोणत्याही मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करावे लागतात. ही इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच मेडिकल कौन्सिलकडून डॉक्टरांना प्रॅक्टिसचे लायसन्स मिळते.

Web Title: Mbbs full form meaning latin history course duration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • History
  • MBBS

संबंधित बातम्या

ऑगस्ट क्रांती दिन: आंदोलन, चळवळीने घडला संघर्षाचा इतिहास! ‘करो या मरो’च्या नाऱ्याने पेटली जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल
1

ऑगस्ट क्रांती दिन: आंदोलन, चळवळीने घडला संघर्षाचा इतिहास! ‘करो या मरो’च्या नाऱ्याने पेटली जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
2

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

Medical Career Options: एमबीबीएस नंतर काय निवडायचे? MD की MS जाणून घ्या कोर्सेसची संपूर्ण माहिती आणि खर्च
3

Medical Career Options: एमबीबीएस नंतर काय निवडायचे? MD की MS जाणून घ्या कोर्सेसची संपूर्ण माहिती आणि खर्च

Dinvishesh 4 August: आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..
4

Dinvishesh 4 August: आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.