फोटो सौजन्य- सोशल मीडिया
BEML Operator Recruitment 2026: ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (BEML) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बीईएमएल लिमिटेडने कंत्राटी तत्त्वावर नॉन-एग्जीक्यूटिव्ह (ऑपरेटर) पदांच्या एकूण ३६२ जागांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून अर्ज मागवले आहेत. बीईएमएल लिमिटेडने जाहीर केलेल्या या ३६२ जागांमध्ये आयटीआय – फिटरच्या १२७, आयटीआय – टर्नरच्या ९३, आयटीआय – वेल्डरच्या ४४, आयटीआय – मशिनिस्टच्या ४० आणि आयटीआय – इलेक्ट्रीशियनच्या ५८ जागांचा समावेश आहे.
या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बीईएमएल लिमिटेडच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ठरवून दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपला नोंदणी अर्ज सबमिट करावा.
अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून संबंधित ट्रेडमध्ये प्रथम श्रेणी म्हणजेच किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’ (NCVT) द्वारे जारी केलेले ‘नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट’ असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांने आपली अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग’ द्वारे जारी केलेले संबंधित ट्रेडचे ‘नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट’ (NAC) असणे अनिवार्य आहे.
अर्जदारांचे कमाल वय २९ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पात्र उमेदवारांची निवड कॉम्प्युटर-आधारित लेखी परीक्षा, शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणी यांसारख्या टप्प्यांच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा १६,९०० रुपये पगार दिला जाईल. यासोबतच उमेदवारांना वैद्यकीय खर्चासाठी (Medical Allowance) प्रतिमहा १,५०० रुपये आणि इतर लाभ व भत्तेही दिले जातील.
सामान्य (General) / EWS / OBC प्रवर्ग: २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / दिव्यांग प्रवर्ग: या प्रवर्गातील उमेदवारांना नोंदणी शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.






