Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारी एमसीएची सीईटी प्रवेश परीक्षा! राज्यात ५५ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

एमसीए सीईटी परीक्षा ३० मार्च २०२६ रोजी राज्यभरात संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी ५५,५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 29, 2026 | 05:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Neeta Parab : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सोमवारी (३० मार्च २०२६) राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे. State Common Entrance Test Cell मार्फत ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार असून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर तिचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेसाठी तब्बल ५५,५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांचा सन्मान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत झाली निवड

यावर्षीच्या नोंदणीमध्ये १९६ अनाथ विद्यार्थी तसेच ९६ दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची ठरत आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२५-२६ मध्ये एमसीए सीईटीसाठी ५६,२५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा नोंदणीचा आकडा किंचित कमी असला, तरी एकूणच मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या या अभ्यासक्रमाकडे वाढत असलेला कल दर्शवते.

मागील चार वर्षांच्या नोंदणी आकडेवारीवर नजर टाकल्यास एमसीए अभ्यासक्रमाची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. २०२३-२४ मध्ये ३४,२४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर २०२४-२५ मध्ये हा आकडा ३९,९६५ इतका झाला. त्यानंतर २०२५-२६ मध्ये मोठी झेप घेत ५६,२५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा ५५,५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करत ही संख्या स्थिर असल्याचे दिसून येते.

दरम्यान, या वर्षीच्या एमसीए सीईटी परीक्षेमध्ये एका परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाऐवजी परीक्षा आता G. H. Raisoni College of Business Management येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी सुधारित प्रवेशपत्र (हॉलतिकीट) डाउनलोड करून नव्या केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रशासकीय पदांची मेगाभरती! रिक्त जागांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागविले ‘संमती पत्र’

विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. संगणकाधारित पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. एकूणच, राज्यभरात मोठ्या प्रमाणावर एमसीए सीईटी परीक्षा पार पडण्याची तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Web Title: Mca cet entrance exam on monday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • CET Exam
  • CET for BCA

संबंधित बातम्या

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार
1

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार

MHT-CET : सीईटी परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू! राज्यातील १९४ केंद्रांवर चाचणी; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?
2

MHT-CET : सीईटी परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू! राज्यातील १९४ केंद्रांवर चाचणी; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.