Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील

Merchant Navy Career Guidance : मर्चेंट नेव्हीमध्ये १० वी आणि १२ वी सायन्स (PCM) नंतर करिअर कसे करावे? जाणून घ्या IMU-CET प्रवेश परीक्षा, डेक व इंजिन विभाग, शारीरिक पात्रता आणि लाखो रुपयांच्या टॅक्स-फ्री पगाराची माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 04:48 PM
नेव्ही

नेव्ही

Follow Us
Follow Us:

Merchant Navy Career Guidance : निळा समुद्र, भलेमोठे जहाज आणि जग फिरण्याची सुवर्णसंधी! ‘मर्चेंट नेव्ही’ हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर रोमांचक आणि हाय-फाय सॅलरीचे चित्र उभे राहते. परंतु, या क्षेत्रात काम करताना अनेकदा एक संभ्रम असतो की, मर्चेंट नेव्हीची नोकरी सरकारी आहे की प्रायव्हेट? अनेकांना ते ‘इंडियन नेव्ही’चा भाग वाटते. मात्र, इंडियन नेव्ही देशाच्या सुरक्षेसाठी काम करते, तर मर्चेंट नेव्ही व्यावसायिक जहाजांद्वारे मालाची आंतरराष्ट्रीय वाहतूक करते.

नोकरी सरकारी की प्रायव्हेट?

मर्चेंट नेव्हीमधील बहुतांश नोकऱ्या प्रायव्हेट असतात. यामध्ये ‘मास्क’, ‘एमएससी’ सारख्या आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांचा समावेश होतो. तथापि, ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (SCI) सारख्या काही सरकारी कंपन्यांमध्ये (PSU) सरकारी नोकरीची संधीही असते. कंपनी कोणतीही असो, येथे काम ‘कॉन्ट्रॅक्ट बेसिस’ वर चालते. म्हणजेच, तुम्ही जितके महिने जहाजावर ड्युटीवर असाल, तितक्याच महिन्यांचा तगडा पगार मिळतो; सुट्टीवर घरी असताना पगार मिळत नाही.

प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता

१२ वी सायन्स नंतर (PCM): जर १२ वीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयात किमान ६०% गुण असतील, तर ‘B.Sc Nautical Science’ किंवा ‘B.Tech Marine Engineering’ करता येते. त्यासाठी IMU-CET ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

१० वी नंतर: अवघ्या ६ महिन्यांचा GP Rating कोर्स करून डेक किंवा इंजिन रेटिंग म्हणून एन्ट्री मिळवता येते.

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही

शारीरिक पात्रता: उमेदवारांची दृष्टी (Eyesight) ६/६ असणे आवश्यक असून ‘डीजी शिपिंग’ मान्यताप्राप्त डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट लागते.

डिपार्टमेंट आणि जोखीम

जहाजावर प्रामुख्याने डेक डिपार्टमेंट (जहाज चालवणे), इंजिन डिपार्टमेंट (मशिनरी सांभाळणे) आणि सॅलून डिपार्टमेंट (खाण्यापिण्याची व्यवस्था) हे विभाग असतात. या नोकरीत खराब हवामान आणि समुद्री चाच्यांचा (पायरेट्स) धोका असतो. मात्र, आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार (IML) कोणतीही दुर्घटना घडल्यास कुटुंबीयांना कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई आणि विम्याचे कवच मिळते.

Marathi Compulsory Law: मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा विधानसभेत इशारा

पगार

मर्चेंट नेव्हीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पगार! सुरुवातीला कॅडेट म्हणून ३० ते ५० हजार रुपये महिना मिळतो. पुढे प्रमोशन मिळाल्यावर ऑफिसर किंवा इंजिनिअरचा पगार २ ते ६ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. तर कॅप्टन किंवा चीफ इंजिनिअरचा पगार ८ ते १५ लाख रुपये प्रतिमहिना असतो. जर तुम्ही वर्षातील १८३ दिवसांपेक्षा जास्त काळ भारताबाहेर जहाजावर घालवला, तर हा पगार पूर्णपणे टॅक्स-फ्री (करमुक्त) असतो.

Web Title: Merchant navy career guidance imu cet exam salary structure deck engine department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • career guide
  • High salary Job

संबंधित बातम्या

Career Guide: फुल-टाइम जॉब की फ्रीलांसिंग निवडावे? कोणता पर्याय तुमच्या भविष्यासाठी ठरेल सर्वोत्तम!
1

Career Guide: फुल-टाइम जॉब की फ्रीलांसिंग निवडावे? कोणता पर्याय तुमच्या भविष्यासाठी ठरेल सर्वोत्तम!

Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!
2

Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!

Fastest Growing Jobs:  लिंक्डइनच्या अहवालातून मोठा खुलासा! एआय (AI) च्या युगातही ‘या’ नोकऱ्यांमधून कमवा बक्कळ पैसा
3

Fastest Growing Jobs: लिंक्डइनच्या अहवालातून मोठा खुलासा! एआय (AI) च्या युगातही ‘या’ नोकऱ्यांमधून कमवा बक्कळ पैसा

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ
4

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.