Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरारच्या बारावी पेपर जळणे प्रकरणावर मंत्री भुसे यांची प्रतिक्रिया,”काळजी करण्याची गरज…”

विरारमध्ये घडलेल्या बारावीच्या पेपर जळाल्याच्या प्रकरणात तपस सुरु आहे. दरम्यान, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सदर प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 13, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. अशातच विरारमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपल्या घरी नेल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने या उत्तरपत्रिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

SSC HSC Exam Results 2025 : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? काय सांगितले शिक्षण मंडळाने?

शिक्षिकेच्या घरातील देव्हाऱ्यातून अचानक आग लागली आणि काही क्षणांत तिच्या घरात ठेवलेल्या १७५ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य काय असेल, यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना विरारच्या गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक मंडळाकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण या प्रकाराला शिक्षिकेची हलगर्जीपणा मानत आहेत, तर काही जण ही एक दुर्दैवी दुर्घटना असल्याचे सांगत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली असून, परीक्षांच्या निकालांवर त्याचा काय परिणाम होईल, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून यावर काय तोडगा निघेल, विद्यार्थ्यांना काय पर्याय दिला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शिक्षण मंडळ आणि प्रशासन यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या १७५ उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेच्या असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स’ याला विषयांच्या या उत्तरपत्रिका होत्या. तपास करता ही आग देवघराला लागली त्यानंतर पसरून यात उत्तरपत्रिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. उत्तरप्रतिका जळाल्याच्या या प्रकरणवार शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,” मुळात, शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका घरामध्ये घेऊन जाणेच चुकीचे आहे. हे कायद्यात बसत नाही. विरारमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व दोषींवर कारवाई केली जाईल.”

राज्यात बहुतेक शाळा अनधिकृत! यात ठाण्याचा नंबर पहिला

मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की,” विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांचे गुण सुरक्षित आहेत.” त्यांचे म्हणणे आहे की उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. तसेच गुणपत्रिकाही तयार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. या प्रकरणात दोषी असणाऱ्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.

Web Title: Minister bhuses reaction to virars 12th paper burning incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • dada bhuse

संबंधित बातम्या

पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम
1

पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम

“भगव्याला बदनाम करण्याचे षडयंत्र केलं…कॉंग्रेस चपराक; मंत्री दादा भुसेंनी मालेगाव निकालावरुन विरोधकांना झापलं
2

“भगव्याला बदनाम करण्याचे षडयंत्र केलं…कॉंग्रेस चपराक; मंत्री दादा भुसेंनी मालेगाव निकालावरुन विरोधकांना झापलं

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण? अनुदान देण्याची करण्यात आली घोषणा
3

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण? अनुदान देण्याची करण्यात आली घोषणा

गोपीचंद पडळकर यांचे कोणाशीच पटेना! कालच्या राड्यानंतर आज दादा भुसेंसोबत शाब्दिक चकमक
4

गोपीचंद पडळकर यांचे कोणाशीच पटेना! कालच्या राड्यानंतर आज दादा भुसेंसोबत शाब्दिक चकमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.