Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?

MPSC Group B Recruitment Postponed SIT Inquiry : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट ‘ब’ २०२५ भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असून स्थगित दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 03:03 PM
mpsc

mpsc

Follow Us
Follow Us:
  • एमपीएससी गट ‘ब’ निवड प्रक्रियेला ब्रेक
  • एसआयटी चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?
  • चौकशी सुरू ठेवा, नियुक्ती थांबवू नका!
सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे

MPSC Group B Recruitment Postponed SIT Inquiry : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट ‘ब’ २०२५ भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असून स्थगित दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. पेपरफुटीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कालावधीतील परीक्षांची चौकशी सुरू असताना निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि पुढील नियुक्ती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशीचा फटका निष्पाप उमेदवारांना का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एमपीएससीने गट ‘ब’ २०२५ अंतर्गत एसटीआयच्या २७९, पीएसआयच्या ३९२, एसआरआयच्या ८४ आणि एएसओच्या ३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. परीक्षा झाल्यानंतर निकाल व निवड याद्याही जाहीर करण्यात आल्या. २३ व २४ ऑगस्टला पात्र उमेदवारांना शिफारसपत्रे देण्यात आल्याची माहिती उमेदवारांनी दिली. मात्र, कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू असतानाच स्थगिती आल्याने पुढील नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे.

परीक्षांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

औषध निरीक्षक २०२४ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर संबंधित कालावधीतील परीक्षांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या चौकशीच्या कक्षेत गट ‘ब’ २०२५ परीक्षेचाही समावेश असल्याने प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र, चौकशी स्वतंत्रपणे सुरू ठेवून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी त्यांची मागणी आहे.

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

आर्थिक, कौटुंबिक अडचणींचाही ताण

दरम्यान, २०२५च्या एसटीआय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी गैरमार्गाने निवड झाल्याच्या संशयावरून संपूर्ण प्रक्रिया थांबविण्याऐवजी ठोस पुराव्यांच्या आधारे चौकशी करावी, अशी भूमिका मांडली आहे. पुण्यात सहा-सात वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका उमेदवाराने वयाच्या ३१व्या वर्षी एसटीआय परीक्षेत यश मिळवले आहे. कुटुंबावर शेतीचे कर्ज असून शिक्षणासाठी मामांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे आता नियुक्ती लवकर व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

चौकशी चालू ठेवा; पण आमची नियुक्ती थांबवू नका

औषध निरीक्षक २०२४ च्या पेपरफुटी प्रकरणानंतर संबंधित कालावधीतील परीक्षांसाठी एसआयटी स्थापन झाली. त्याच काळात आमची ग्रुप ‘ब’ २०२५ ची परीक्षा झाली आणि आम्ही पात्र ठरलो. एसआयटीची चौकशी सुरू राहू द्या; मात्र त्यासोबत आमची कागदपत्र पडताळणी आणि नियुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवावी. आम्हाला थांबवू नका, अशी मागणी एका निवड झालेल्या उमेदवाराने केली.

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी अचानक स्थगित झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दूरवरून येणाऱ्या उमेदवारांना आर्थिक, मानसिक आणि सामाजिक ताण सहन करावा लागत आहे. नोकरी कधी मिळणार, पुढील प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे चौकशी सुरू ठेवतानाच उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया थांबवू नये. अशी मागणी नांदेडहून आलेल्या एका निवड झालेल्या विद्यार्थिंनीने केली.

Web Title: Mpsc group b recruitment 2025 process stalled sit inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • MPSC Exam
  • Protest

संबंधित बातम्या

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
1

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
2

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार
3

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
4

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.