Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Group C Exam : गट-क संयुक्त परीक्षेचा विस्तार; २१ नव्या संवर्गांना आयोगाची मंजुरी

MPSC Group C Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजनेत २१ नव्या संवर्गांचा समावेश केला आहे. यामुळे पूर्वीच्या सहा संवर्गांसह परीक्षेची व्याप्ती वाढली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 07, 2026 | 10:12 PM
MPSC Revised Exam Scheme ( MPSC सुधारित परीक्षा योजना )

MPSC Revised Exam Scheme ( MPSC सुधारित परीक्षा योजना )

Follow Us
Follow Us:
  • संवर्गांचाही प्रस्तुत परीक्षा योजनेत समावेश झाल्याचे मानण्यात येणार   
  • सामाईक पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे एकत्रित निकाल जाहीर  
  • प्रतीक्षा यादीसंदर्भातील तरतुदीतही सुधारणा करण्यात आली   
MPSC Group C Exam :   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजनेत २१ नव्या संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आयोगाने २० मे २०२६ रोजी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेची परीक्षा योजना प्रसिद्ध केली होती. या योजनेतील परिच्छेद १.१ मध्ये सहा संवर्गांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, गट-क मधील ज्या संवर्गांसाठी आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले आहे, अशा २१ संवर्गांचा आता परीक्षा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संवर्गांची यादी परिशिष्ट क्रमांक १ मध्ये देण्यात आली आहे.

संवर्गांचाही प्रस्तुत परीक्षा योजनेत समावेश झाल्याचे मानण्यात येणार

समान शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या अन्य संवर्गांसाठी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास, त्या संवर्गांचाही प्रस्तुत परीक्षा योजनेत समावेश झाल्याचे मानण्यात येणार आहे. विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांसाठी वयोमर्यादा २० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेतील परिच्छेद ३.२ नुसार राहणार असून, शासनाच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या निर्णयांनुसार त्यात बदल लागू राहतील.

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

सामाईक पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे एकत्रित निकाल जाहीर

पूर्व परीक्षेच्या निकाल प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे. सामान्य शैक्षणिक अर्हता असलेल्या संवर्गांसाठी उमेदवारांनी अर्जात दिलेला विकल्प आणि भरावयाच्या अराखीव व आरक्षित पदांच्या एकूण संख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार सामाईक पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गांसाठी मात्र स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गांसाठी विहित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

प्रतीक्षा यादीसंदर्भातील तरतुदीतही सुधारणा करण्यात आली

एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी एकच सामाईक मुख्य परीक्षा घेण्यात येत असल्यास, उमेदवारांकडून आवश्यकतेनुसार संवर्ग अथवा सेवेचा विकल्प आणि पसंतीक्रम घेण्यात येईल. तसेच प्रतीक्षा यादीसंदर्भातील तरतुदीतही सुधारणा करण्यात आली आहे.

परीक्षा योजनेतील इतर अटी व शर्तींमध्ये काही बदल झाल्यास त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

 

Web Title: Mpsc group c exam 2026 21 new cadres added revised exam scheme sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • education
  • education news
  • MPSC Exam
  • mpsc news

संबंधित बातम्या

Supreme Court News: विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा हटवली; बार कौन्सिल ऑफ इंडियाची सुप्रीम कोर्टात माहिती
1

Supreme Court News: विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा हटवली; बार कौन्सिल ऑफ इंडियाची सुप्रीम कोर्टात माहिती

NEET PG 2026 Counselling: दुसऱ्या फेरीचे शेड्युल बदलले, आता ७ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू
2

NEET PG 2026 Counselling: दुसऱ्या फेरीचे शेड्युल बदलले, आता ७ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू

Women in Management Report: कोणत्या देशात सर्वाधिक महिला मॅनेजर; भारताचा कितवा क्रमांक?
3

Women in Management Report: कोणत्या देशात सर्वाधिक महिला मॅनेजर; भारताचा कितवा क्रमांक?

MBA with AI vs General MBA यांपैकी कोणता पर्याय उत्तम? करिअर, पगार आणि भविष्यातील संधी जाणून घ्या
4

MBA with AI vs General MBA यांपैकी कोणता पर्याय उत्तम? करिअर, पगार आणि भविष्यातील संधी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.