Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Paper Leak: ‘पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी…!’ विश्वजित कदम यांनी विद्यार्थ्यांना दिले आश्वासन

MPSC Paper Leak: MPSC पेपरफुटीप्रकरणी दोषींना केवळ निलंबन नको तर कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी. पुण्यातील सत्कार समारंभात आमदार विश्वजित कदम यांनी दिले विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 27, 2026 | 03:39 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटीप्रकरणी केवळ निलंबन नको तर कठोर शिक्षा व्हावी
  • एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विश्र्वजीत कदम यांचा गौरव
  • पुरावे शोधण्याचे आवाहन
सोनाजी गाढवे/ नवराष्ट्र पुणे

MPSC Paper Leak: एमपीएससीच्या पेपरफुटीविरोधात केलेले आंदोलन ही केवळ विद्यार्थ्यांची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. या आंदोलनाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि भ्रष्ट राजकारणाला हादरवून टाकले आहे. चौकशी समितीकडून पारदर्शक अहवाल येणे अपेक्षित असून दोषींना निलंबन नव्हे तर कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणी पेपरफुटीचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांनी केले.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढणारे आमदार विश्वजित कदम यांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सोमवार दि. २६ रोजी इंदूलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नील भिसे, अमोल साळवे, धनंयज निकम, प्रवीण गावडे, साहेबराव क्षीरसागर, रविराज कांबळे, अजय जगताप, अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, गोकुळ बेलेपाटील यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात पुढाकर असलेले ऋषिकेश गांगुर्डे, विवेकानंद पाटील उपस्थित होते.

विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भावी आधारस्तंभ

विश्वजित कदम पुढे म्हणाले, पेपरफुटी ही एका व्यक्तीमुळे होत नसून ती संपूर्ण यंत्रणा असते. या यंत्रणेचा छडा लागणे गरजेचे आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राला संदेश गेला पाहिजे की वर्तमानातच नव्हे तर भविष्यातही पेपरफुटीचा विचार कोणाच्याही मनात येऊ नये. गरीब पार्श्वभूमी असतानाही सोळा-सोळा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष कौतुकास्पद आहे. हे केवळ विद्यार्थी नसून महाराष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत.

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा

पुरावे शोधण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांना आवाहन करताना कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी गटागटाने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पेपरफुटी संदर्भातील आणखी पुरावे शोधून ते चौकशी समितीला द्यावेत. या प्रक्रियेला आपला संपूर्ण पाठिंबा आहे. सरकारने जनतेशी बांधील राहून चौकशीत कोणताही अडथळा आणू नये. अहवाल योग्य वाटल्यास तो मान्य करू, परंतु अयोग्य वाटल्यास त्यात दुरुस्ती करून चौकशी पुढे नेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून लढावे लागले तरी मी विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

MPSC Bank मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत पहा एका क्लिकवर..

💡

Frequently Asked Questions

  • Que: आमदार विश्वजित कदम यांचा सत्कार कुठे व का करण्यात आला?

    Ans: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी लढा दिल्याबद्दल पुण्यातील शास्त्री रोड, इंदूलाल कॉम्प्लेक्स येथे विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

  • Que: विश्वजित कदम यांनी पेपरफुटीप्रकरणी काय मागणी केली आहे?

    Ans: चौकशी समितीकडून पारदर्शक अहवाल यावा आणि दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई न करता कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • Que: त्यांनी विद्यार्थ्यांना काय आवाहन केले आहे?

    Ans: विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पेपरफुटी संदर्भातील आणखी पुरावे शोधून ते चौकशी समितीला द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Mpsc paper leak vishwajeet kadam statement pune marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • MPSC Exam
  • mpsc news
  • MPSC Paper Leak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.