फोटो सौजन्य - Social Media
नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) ने Apprentice कायदा, 1961 अंतर्गत विविध Apprentice पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार डिप्लोमा, पदवीधर आणि ट्रेड Apprentice ट्रेनी पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती संधी एनसीएलच्या विविध युनिट्ससाठी आहे आणि उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे त्यांच्या करिअरला दिशा देता येईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे होणार असून, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
एनसीएल Apprentice भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 26 वर्षे असावे (कट ऑफ तारखेनुसार). सरकारच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित असेल. त्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करणे महत्त्वाचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना NCL च्या विविध युनिट्समध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि भविष्यात रोजगाराच्या संधी वाढतील.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.nclcil.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटवर गेल्यानंतर, “करिअर” किंवा “Apprentice” विभागावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी, कारण चुकीची किंवा अपूर्ण माहिती अर्ज फेटाळला जाण्याचे कारण ठरू शकते. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.), जन्मदाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून भविष्यातील संदर्भासाठी ठेवावी. तसेच, भरती प्रक्रियेतील कोणत्याही अद्ययावत माहितीसाठी आणि निवड प्रक्रियेतील टप्प्यांविषयी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
एनसीएलमधील ही भरती उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते, कारण त्यांना केवळ तांत्रिक आणि औद्योगिक प्रशिक्षण मिळणार नाही, तर त्यांचे कौशल्यविकास होऊन भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील. प्रशिक्षण कालावधीदरम्यान उमेदवारांना उद्योगातील व्यावहारिक ज्ञान मिळेल, जे त्यांना भविष्यातील नोकरीच्या शोधात मदत करेल. एनसीएलमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी मिळू शकतात, कारण खाणकाम, ऊर्जा उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी!