फोटो सौजन्य - Social Media
गोवा तसेच महाराष्ट्र राज्यात भरतीची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड रिक्रुटमेंटने या भरतीचे आयोजन केले आहे. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी या भरतीला सुरुवात झाली आहे. तसेच उमेदवारांना २७ मार्चपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना विविध पदांसाठी या भरतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. गोवा आणि इतर राज्यातही या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. उमेदवार www.goashipyard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२८ फेब्रुवारी ते २७ मार्चपर्यंत या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना ६ एप्रिलपर्यंत या भरतीसाचे हार्ड कॉपीचे सबमिशन निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये भरायचे आहे. तर OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. PwBD तसेच Ex-Servicemen उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करता येणार आहे.
एकूण तीन टप्प्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवजांच्या पडताळणीचा समावेश आहे. तर पुढे वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. या सर्व टप्प्यांना पात्र करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार २७ मार्चपर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात सखोल माहिती पुरवण्यात आली आहे.