Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआयने कसे शोधून काढलं ‘पुणे-नांदेड’ कनेक्शन पहा एका क्लिकवर…

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून नांदेडमधील कदम कुटुंबाची ८ तास चौकशी. अभ्यासात साधारण असणाऱ्या मुलीला अचानक ५६० गुण मिळाल्याने ५ लाखांच्या पेपर खरेदीचा संशय.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 11:22 AM
NEET Paper Leak 2026

NEET Paper Leak 2026

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak: देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ निर्माण केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सापडत आहेत. अलीकडेच पुन्हा एकदा केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या एका पथकाने नांदेडमध्ये एका कुटुंबावर कारवाई केली. यावेळी शहरातील उच्चभू समजल्या जाणाऱ्या एका कुटुंबाची चौकशी सीबीआयने तब्बल 7 ते 8 तास केली. या कुटुंबियांनी आपल्या मुलीसाठी लाखो रूपयात नीटचा पेपर खरेदी केला असल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कदम कुटुंबियांची सीबीआयकडून कसून चौकशी 

नीट पेपरफुटीचे प्रकरण उघडीस आल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे, लातूर आणि नाशिक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान नांदेडमधील विद्युत नगर भागातील आशा रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कदम कुटुंबियांच्या घरी सीबीआयने कसून चौकशी केली. या कुटुंबातील सदस्यांना आणि 7 ते 8 मुलींना वेगवेगळ्या खोलीत बसवून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. यावेळी सीबीआयने महत्त्वपूर्ण कागदपत्रांची बारकाईने तपासणी देखील केली.
Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी.

नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबातील एका मुलीने यंदाची नीट परीक्षा दिली होती. या मुलीला परीक्षेत यश प्राप्त करून देण्यासाठी तिच्या कुटुंबियाकडून 5 लाख रूपये देऊन नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. ही विद्यार्थीनी अभ्यासात साधारण असून तिला 100 ते 120 गुण मिळत होते. मात्र, जेव्हा तीला परीक्षेच्या 15 दिवसांपूर्वी पुणे येथे तयारीसाठी गेल्यानंतर  सरावादरम्यान 560 गुण मिळाले. ही बाब उघड झाल्यानंतर सीबीआयने कसून चौकशी केली.

या कारवाईदरम्यान सीबीआयच्या पथकाने घरातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याची माहिती आहे. आता नांदेडच्या या कारवाईमुळे या रॅकेटचे कनेक्शन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांशी आणि मोठ्या एजंटशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यातील शिक्षणाचे केंद्र

नांदेड हे मराठवाड्यातील शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी येथे हजारो विद्यार्थी असतात. अशातच येथे सीबीआयचे अधिकारी पोहचल्यामुळे इतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईनंतर सीबीआय पथक पुढील तपासासाठी आपला मोर्चा कुठे वळवेल? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, जप्त कागदपत्राद्वारे येथील काही जणाची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

Dr Shrikant Jichkar: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १४ पदव्या! ‘हा’ भारतीय विक्रम करणारे डॉ. श्रीकांत जिचकार नेमके कोण होते?

Web Title: Neet paper leak cbi raid nanded maharashtra kadam family investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’
4

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.