फोटो सौजन्य- सोशल मीडिया
AAICLAS Airport Recruitment 2026: नोकरी शोधणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अँड एलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड’ (AAICLAS) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने सिक्युरिटी स्क्रीनर (Security Screener) आणि असिस्टंट सिक्युरिटी (Assistant – Security) या रिक्त पदांसाठी एकूण २२० जगाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही पूर्व अनुभवाची गरज नाही. म्हणजेच फ्रेशर उमेद्वारही यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेद्वारांची नियुक्ती निश्चित कराराच्या आधारावर केली जाईल. या मोहिमेअंतर्गत सिक्युरिटी स्किनरच्या १५८ जागा तर असिस्टंट सिक्युरिटीच्या ६२ जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेद्वारांना देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर नियुक्ती दिली जाईल.
दोन्ही पदांसाठी नियुक्तीची ठिकाणे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत खालीलप्रमाणे असेल.
सिक्युरिटी स्क्रीनर या पदासाठी निवड झालेल्या उमेद्वारांना देहरादून, कोलकता, पाटणा, तिरूचिरापल्ली, कोझिकोड आणि उद्यपूर विमानतळावर नियुक्ती दिली जाईल.
तसेच या पदासाठी उमेद्वारांनी १८ मे २०२६ पासून ८ ते २०२६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी निवडलेल्या उमेद्वारांना तिरूपती, त्रिची, मदुराई, भुवनेश्वर आणि उद्यपूर विमानतळवर काम करण्याची संधी मिळेल.
या पदासाठी उमद्वारांनी ११ जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावे.
सिक्युरिटी स्क्रीनर: उमेद्वारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यू प्रवर्गातील पदवीत किमान ६०% गुण तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेद्वारांना ५५% गुण असणे अनिवार्य आहे.
असिस्टंट सिक्युरिटी: या पदासाठी उमेद्वार केवळ १२ वी पास असणे आवश्यक आहे.
दोन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे.
या भरतीसाठी उमेद्वारांची निवड गुणवत्तेवर आधारित (Merit-based) तसेच ऑनलाइन इंटरॅक्शन किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेद्वारांना विमानतळ आणि कार्गो कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा तपासणी, बॅगेज स्क्रिंनिग, बॅगेज हँडलिंग आणि इतर ऑपरेशनल कामांची जबाबदारी असेल. पात्र उमेद्वारांनी ‘AAICLAS’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.






