Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

NEET UG 5th Largest Exam: एसबीआय रिसर्चच्या नवीन अहवालानुसार, २५ लाख विद्यार्थ्यांसह भारतातील एक परीक्षा जगातील पाचवी सर्वात मोठी परीक्षा ठरली आहे. तर चीनमधील गाओकाओ परीक्षा पहिल्या स्थानी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 10:24 AM
world largest exam

world largest exam

Follow Us
Follow Us:

NEET UG 5th Largest Exam:  भारतातील मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी (NEET UG) ही जगातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक आहे. सुमारे २५ लाख उमेदवारांच्या सहभागासह, उमेदवारांच्या संख्येच्या बाबतीत नीट यूजीला जगातील पाचवी सर्वात मोठी परीक्षा म्हटले गेले आहे. ही माहिती भारतीय स्टेट बैंकच्या (SBI) ‘द स्टेट ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया’ या संशोधन अहवालात समोर आली आहे. या अहवालात भारतसह विविध देशांमधील मोठ्या परीक्षांची तुलना करण्यात आली आहे, ज्यामध्ये चीनची ‘गाओकाओ’ परीक्षा सर्वाधिक उमेदवारांची संख्या असलेली परीक्षा ठरली आहे.

एसबीआय रिसर्चच्या आकडेवारीनुसार, चीनच्या गाओकाओमध्ये सुमारे १.२९ कोटी उमेदवार सहभागी होतात. यानंतर ब्राझीलच्या ईएनईएममध्ये (ENEM) सुमारे ४८ लाख, चीनच्या गुओकाओ सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत सुमारे ३० लाख आणि चीनच्या नॅशनल मास्टर डिग्री एन्ट्रन्स परीक्षेत सुमारे ३४ लाख उमेदवार सहभागी होतात. सुमारे २५ लाख उमेदवारांसह नीट यूजी या यादीत पाचव्या स्थानावर आहे. यानंतर तुर्किएच्या वायकेएसमध्ये (YKS) सुमारे २४ लाख, नायजेरियाच्या युटीएमईमध्ये (UTME) २२ लाख आणि एसएटी (SAT) टीममध्ये सुमारे २० लाख उमेदवार सहभागी होतात.

भारतात सर्वाधिक उमेदवार असलेल्या प्रमुख परीक्षा

अहवालानुसार, भारतातील अनेक परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतात:

  • नीट यूजी (NEET UG): सुमारे २५ लाख (वैद्यकीय प्रवेश परीक्षा)
  • युपीएससी (UPSC): सुमारे १२ लाख (नागरी सेवा भरती परीक्षा)
  • जेईई मेन (JEE Main): सुमारे १० लाख (अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा)
  • युजीसी नेट (UGC Net): सुमारे ८ लाख (उच्च शिक्षणाशी संबंधित पात्रता परीक्षा)

चीनची ‘गाओकाओ’ परीक्षा कशी आयोजित केली जाते?

एसबीआय रिसर्चने चीनच्या गाओकाओ परीक्षेच्या व्यवस्थेचाही उल्लेख केला आहे. २०२६ मध्ये सुमारे १.२९ कोटी उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ही परीक्षा देशभरातील ७,९८१ केंद्रांवर घेण्यात आली, जिथे ३.४८ लाख परीक्षा कक्ष आणि २१,०५० आरक्षित कक्षांची व्यवस्था होती.

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परीक्षेच्या सुरक्षेसाठी सुरक्षित छपाई सुविधा (Secure Printing Facility), २४ तास सीसीटीव्ही निगरानी, प्रश्नपत्रिका वाहून नेण्यासाठी बख्तरबंद आणि जीपीएस ट्रॅक केलेली वाहने, पोलीस सुरक्षा आणि सुरक्षित स्टोरेज सुविधांचा वापर केला जातो. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची ओळख पटवणे आणि प्रतिबंधित वस्तूंची तपासणी कडक पद्धतीने केली जाते. याशिवाय, परीक्षा काळात वाहतूक व्यवस्थापन, ध्वनी नियंत्रण, अन्न व आरोग्य सुरक्षा आणि हवामानाची स्थिती यावरही विशेष लक्ष दिले जाते.

भारताच्या परीक्षा व्यवस्थेबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना

मोठ्या परीक्षांच्या आयोजनाचा अनुभव लक्षात घेऊन भारताच्या परीक्षा प्रणालीमध्ये काही बदलांची गरज या अहवालात वर्तवण्यात आली आहे. सद्यस्थितीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही ‘सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा १८६०’ अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. जुलै २०२४ पर्यंत एनटीएने २४० पेक्षा जास्त परीक्षा आयोजित केल्या आहेत, ज्यात ५.४ कोटींहून अधिक उमेदवार सहभागी झाले आहेत.

NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड

अहवालात एनटीएच्या कर्मचाऱ्यांसंबंधी नमूद केले आहे की, एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८ टक्के कर्मचारी हे कंत्राटी किंवा आऊटसोर्स स्वरूपाचे होते. एसबीआय रिसर्चने एनटीएला अधिक मजबूत आणि कायदेशीर चौकट मिळण्यासाठी संसदेच्या माध्यमातून ‘एनटीए कायदा’ (NTA Act) तयार करण्याची शिफारस केली आहे.

Web Title: Neet ug 5th largest exam sbi research report 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • competitive exam
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
1

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड
2

NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा
3

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
4

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.