फोटो सौजन्य- सोशल मीडिया
इंटर्नशिप हे सहसा कॉर्पोरेट कल्चर डेस्क, जॉब, मीडिया, मार्केटिंग किंवा सॉफ्टवेअर यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित असते, ज्यामध्ये थिअरी अभ्यासक्रमाला कॉर्पोरेटमध्ये प्रॅक्टिकली करणे हा उद्देश असतो तर अप्रेंटिसशिप हे तांत्रिक, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेड आणि स्किल बेस जॉब्सशी जोडलेली संकल्पना आहे, जिथे एखाद्या विशिष्ट ट्रेडमध्ये पूर्णपणे मास्टर बनवणे हा उद्देश असते.
इंटर्नशिपचा कालावधी सामान्यतः लहान म्हणजेच काही आठवड्यांपासून ६ महिन्यांपर्यंतचा असतो. याउलट, अप्रेंटिसशिप ही १ ते ३ वर्षे किंवा त्याहून अधिक लांब आणि निश्चित करारावर आधारित असते.
इंटर्नशिपमध्ये अनेकदा अनपेड किंवा कमी स्टाइपेंड मिळू शकते, तर अप्रेंटिसशिप ही कायदेशीररित्या नियमन केलेली ट्रेनिंग स्कीम असून यात सरकारी नियमांनुसार निश्चित मानधन (Stipend) मिळणे अनिवार्य असते.
NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड
जर तुम्हाला डेस्क जॉब, मॅनेजमेंट, क्रिएटिव्ह फिल्ड किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचे असेल, तर इंटर्नशिप उत्तम पर्याय आहे. याच्या उलट, जर तुम्ही तांत्रिक क्षेत्र (Technical Field), आयटीआय (ITI), डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राउंडचे असाल आणि कौशल्ये शिकून थेट पक्की नोकरी किंवा रोजगार मिळवायचा असेल, तर अप्रेंटिसशिप अधिक फायदेशीर ठरेल.






