Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: नीट फेरपरीक्षेसाठी NTA चा कडक ड्रेस कोड! हिजाब, बुर्का किंवा पगडी घालणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का?

NEET UG Re-Exam: NEET UG फेरपरीक्षेला जाण्यापूर्वी 'हे' नियम नक्की वाचा! यंदा बुट, घड्याळ आणि फुल शर्ट घालून जाणाऱ्यांना केंद्रात प्रवेश मिळणार का? पहा NTA चे नियम!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 03:22 PM
NTA

NTA

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam 2026 Dress Code: नीट यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचणार आहेत, मात्र यंदा केवळ अभ्यासच नाही, तर ‘ड्रेस कोड’चे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ड्रेस कोडचे पालन न केल्यास तपासणीत जास्त वेळ लागू शकतो आणि प्रवेशावरही परिणाम होऊ शकतो, असे एनटीएने (NTA) स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सुरक्षेसाठी यंदा पहिल्यांदाच परीक्षा केंद्रावरील वेळ एनटीएच्या विशेष भिंतीवरील घड्याळाद्वारे निश्चित केली जाणार आहे.

काय परिधान करावे?

NTA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुरुष उमेदवारांना अर्ध्या बाह्यांचे (हाफ स्लीव्हज) शर्ट किंवा टी-शर्ट आणि साधी पँट किंवा ट्रउझर घालून येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोठे बटण, चेन किंवा धातूच्या डिझाईनचे कपडे टाळण्यास सांगितले आहे. महिला उमेदवार अर्ध्या बाह्यांची कुर्ती किंवा टॉप घालू शकतात. पायजमा किंवा लोअरमध्ये धातूची झिप नसावी. बुर्का, हिजाब, पगडी किंवा इतर धार्मिक पोषाख परिधान करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी आहे, परंतु त्यांना विशेष तपासणीसाठी वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे.

कोणत्या गोष्टींवर बंदी आहे?

विद्यार्थ्यांना बुट घालून येण्यास बंदी असून, केवळ चप्पल किंवा कमी हीलचे सँडल घालण्यास परवानगी असेल. याशिवाय गॉगल, टोपी, हातघड्याळ, बेल्ट, स्कार्फ, हेअर बँड, अंगठी, कडे, ब्रेसलेट आणि कानातील-नाकतील दागिन्यांसह कोणत्याही धातूच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम

NTA चे विशेष घड्याळ आणि कडक सुरक्षा

यंदा प्रत्येक परीक्षा कक्षात NTA चे प्रमाणित भिंतीवरील घड्याळ लावले जाईल. परीक्षेची सुरुवात आणि शेवट याच घड्याळाच्या वेळेनुसार ठरेल, जेणेकरून वेळेबाबत कोणताही संभ्रम राहणार नाही. परीक्षा केंद्रांवर दुहेरी थरांचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्कॅनर लावण्यात आले असून नियंत्रण कक्षातून त्यावर लक्ष ठेवले जाईल. पारदर्शकता राखण्यासाठी देशभरात मॉकड्रिलद्वारे व्यवस्था तपासली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करून वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचावे.

Maharashtra Education: राज्यातील ४ लाख शिक्षकांना मिळणार गुगलचं ट्रेनिंग! सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा?

Web Title: Neet ug re exam 2026 dress code nta strict rules guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Fashionble dress
  • NEET Exam

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.