Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2027 Schedule: नीट यूजी २०२७ च्या वेळापत्रकासाठी करावी लागणार प्रतीक्षा; फेब्रुवारीमध्ये होणार नवीन तारखांची घोषणा?

NEET UG 2027 Schedule: नीट यूजी २०२७ (NEET UG 2027) च्या शेड्युलची प्रतीक्षा करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नीट यूजी २०२७ च्या वेळापत्रकासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 03, 2026 | 11:56 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • नीट यूजी २०२७ च्या वेळापत्रकासाठी करावी लागणार प्रतीक्षा
  • जानेवारी २०२७ मध्ये येणार नीलेकणी समितीचा अहवाल
  • फेब्रुवारी २०२७ मध्ये का जारी होईल वेळापत्रक?
NEET UG 2027 Schedule:  देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट यूजी २०२७ (NEET UG 2027) च्या शेड्युलची प्रतीक्षा करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नीट यूजी २०२७ च्या वेळापत्रकासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेन २०२७ चे वेळापत्रक जारी केले आहे, मात्र वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तारखांवर अद्याप संशय कायम आहे. परीक्षा प्रणालीमध्ये करण्यात येत असलेल्या बदलांमुळे यास उशीर होत आहे.

नीट यूजीच्या मागील सत्रांमध्ये झालेला गोंधळ आणि पेपर लीकसारख्या घटनांमधून धडा घेत सरकार या वेळी कोणतीही घाई करणार नाही. एनटीए नीट यूजी २०२७ चे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी संपूर्ण व्यवस्था सुरळीत करू इच्छिते. नीट यूजी परीक्षेचे नवीन पॅटर्न, सुरक्षेचे निकष (सिक्युरिटी स्टँडर्ड्स) आणि ऑनलाईन मोडवर शिक्कामोर्तब होईपर्यंत तारखांची घोषणा केली जाणार नाही. नीट यूजी २०२७ परीक्षेत काय नवीन घडणार आहे आणि फेब्रुवारीपर्यंत का प्रतीक्षा करावी लागू शकते, हे जाणून घेऊया.

जानेवारी २०२७ मध्ये येणार नीलेकणी समितीचा अहवाल

देशपातळीवरील मोठ्या परीक्षांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या समितीचे मुख्य काम परीक्षा प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे आणि सुरक्षेचे नियम ठरवणे हे आहे. देशभरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी या समितीला ५०,००० हून अधिक सूचना दिल्या आहेत. हा अहवाल ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर केला जाणे अपेक्षित होता, मात्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या नवीन प्रतिज्ञापत्रानुसार हा अहवाल जानेवारी २०२७ मध्ये सादर केला जाईल.

NTA Reforms 2026: एनटीएच्या कार्यपद्धतीत मोठे फेरबदल! परीक्षा प्रणाली ‘फुल-प्रूफ’ करण्यासाठी उचलली ‘ही’ मोठी पावले

नीलेकणी समितीचा हा अहवाल NEET UG 2027 चे भविष्य ठरवणार आहे. नीट यूजी परीक्षा पेन-पेपर मोडवरून बदलून संगणक आधारित चाचणी मोडमध्ये घेण्यावर भर दिला जात आहे. नंदन नीलेकणी यांनी यापूर्वीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्रश्नपत्रिका तयार करणे आणि परीक्षा केंद्रावरच पेपर प्रिंट करणे यासारखे सुचवले आहे. सीबीटी मोडमध्ये परीक्षा घेण्यासाठी लॉजिस्टिक्स, कॉम्प्युटर लॅब आणि सुरक्षेची भक्कम व्यवस्था करावी लागते. म्हणूनच, संपूर्ण अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच NTA पुढील पाऊल उचलेल.

SI In Pakistan: पाकिस्तानात सब-इन्स्पेक्टर बनण्यासाठी काय आहे पात्रता? लोकसेवा आयोगाद्वारे अशी होते निवड

फेब्रुवारी २०२७ मध्ये का जारी होईल वेळापत्रक?

टास्क फोर्स जानेवारी २०२७ च्या शेवटी आपला अंतिम अहवाल सादर करेल. त्यामुळे NTA त्यांच्या शिफारसींचा आपल्या परीक्षा कॅलेंडरमध्ये समावेश करण्यासाठी फेब्रुवारी २०२७ ची वेळ निवडू शकते. परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये झाल्यास ती अनेक शिफ्टमध्ये किंवा दिवसांत घ्यावी लागू शकते. यासाठी एका सुस्थितीत असलेल्या ब्लूप्रिंटची (आरेखनाची) गरज असते. जे उमेदवार आतापासूनच तारखांचा अंदाज लावत आहेत, त्यांना फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ही प्रतीक्षा वाटली तरीही, भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक पाऊल ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीट यूजी २०२७ चे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर का होत आहे?

    Ans: परीक्षा प्रणालीत सुधारणा करणे, सुरक्षेचे कडक नियम लागू करणे आणि परीक्षा पद्धतीबाबत (ऑनलाइन/सीबीटी) अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल अजून यायचा असल्याने वेळापत्रक लांबणीवर पडले आहे.

  • Que: नंदन नीलेकणी समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार आहे?

    Ans: सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या नवीन प्रतिज्ञापत्रानुसार, हा अहवाल जानेवारी २०२७ च्या शेवटी सादर केला जाईल.

  • Que: नीट यूजी परीक्षा पेन-पेपर मोडवरून बदलली जाऊ शकते का?

    Ans: होय, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी नीट यूजी परीक्षा पेन-पेपर मोडवरून काढून संगणक आधारित चाचणी (CBT - Computer Based Test) मोडमध्ये घेण्यावर विचार केला जात आहे

Web Title: Neet ug 2027 schedule nta exam updates sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • education
  • Entrance exam
  • NEET Exam

संबंधित बातम्या

SI In Pakistan: पाकिस्तानात सब-इन्स्पेक्टर बनण्यासाठी काय आहे पात्रता? लोकसेवा आयोगाद्वारे अशी होते निवड
1

SI In Pakistan: पाकिस्तानात सब-इन्स्पेक्टर बनण्यासाठी काय आहे पात्रता? लोकसेवा आयोगाद्वारे अशी होते निवड

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
2

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
3

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
4

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.